पाचोरा नगरपालिकेला ‘स्कॉच सिल्व्हर अवार्ड’
झूम मराठी
पाचोरा (झूम मराठी) शहराचे आरोग्य तपासायचे असेल, तर पालिकेच्या म्हणजेच नगर पालिकेच्या कामांची नाडी मोजावी लागते. स्कोच संस्थेने जळगाव जिल्ह्यातील पाचोरा नगरपालिकेला ‘माझी वसुंधरा’ अंतर्गत पाचोरा शहरात असंख्य वृक्ष लागवड करून पर्यावरण तसेच परिसर स्वच्छ ठेवाण्यासाठी मेहनत घेतली होती त्या जोरावर ‘माझी वसुंधरा – स्कोच अवॉर्ड इन म्युनिसिपल गव्हर्नन्स सिल्वर’ हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहॆ.राष्ट्रीय पातळीवरील अत्यंत महत्वाचा समजला जाणारा स्कॉच सिल्व्हर अवॉर्ड पाचोरा नगरपरिषदेस नुकताच म्युन्सीपल गव्हर्नन्स (माझी वसुंधरा अभियान) या घटकाअंतर्गत मिळालेला आहे. पाचोरा नगरपरिषदेने शहरात पर्यावरण संवर्धन करण्याचा ध्यास घेऊन जोमाने काम करीत आहे. त्यात उद्यान विकसित करणे,नदी स्वच्छता करणे,कचरामुक्त शहर बनविणे, अपारंपारिक ऊर्जा वापरास प्रोत्साहन देणे, मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करुन संगोपन करणे,शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिक वस्तूंना बंदी घालणे,दैनंदिन घनकचरा संकलन करून त्याचे शास्त्रोक्त पध्दतीने व्यवस्थापन करणे, इत्यादी कामे करण्यात येत आहे.
सदर कामाचे नियोजन करीता असतांना येत असलेल्या अडचणी व त्या अडचणींवर यशस्वी मात करून नगर पालिकेने केलेल्या विकास कामाचे प्रकल्प (Project Report) तयार करून राष्ट्रीय पातळीवरील स्कोच संस्था, दिल्ली येथे पाठविण्यात आले होते. प्रकल्पाचा सविस्तर अभ्यास करून पाचोरा नगर पालिकेकडून मुख्याधिकारी शोभा बाविस्कर मॅडम यांना प्रकल्पाची यशस्वी ऑनलाईन मांडणी करण्यास संधी देण्यात आली होती. मिळालेल्या संधीचे सोने करीत मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीमती.शोभा बाविस्कर मॅडम यांनी प्रकल्पाची ऑनलाईन मांडणी अत्यंत उत्कृष्टरित्या करून नगरपालिकेने शहरातील नागरिकांचे अभिप्राय व ऑनलाईन वोटिंग मधे उत्कृष्ठ कामगीरी करीत उपांत्य फेरी मधे प्रवेश केला. त्यानंतर अंतिम फेरीमध्ये देशातील प्रगत शहरांच्या प्रकल्पांशी स्पर्धा करून पाचोरा नगरपरिषदेने Municipal Governance या घटकात सिल्व्हर अवॉर्ड पटकवीला असून याबाबत नगरपरिषद कर्मचारी व शहरातील सुजाण नागरीक यांनी मुख्याधिकारी श्रीमती. बाविस्कर यांचे अभिनंद केले आहे.



पाचोरा नगर परिषदेतर्फे राष्ट्रीय पातळीवर नावाजलेला व महत्त्वपूर्ण अशा स्कोच अवॉर्ड साठी आपले नामांकन दाखल केले होते. अंतिम फेरीमध्ये पाचोरा नगरपालिकेचे उत्कृष्ट असे प्रदर्शन झाले असून माझी वसुंधरा या विषयावर पाचोरा नगरपरिषदेला मिळाला आहे. यामुळे पाचोरा नगरपरिषद च्या प्रशासक तथा मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.



