नगरदेवळा पोलीसांनी गुरे चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या : दोघांना औरंगाबाद मधुन अटक
नगरदेवळा ता.पाचोरा : बदरखे व आखतवाडे ता.पाचोरा येथिल दोन बैल जोड्या पंचवीस सव्वीस जुलै ला शेतातून चोरी गेल्या होत्या.त्या बाबत पाचोरा पोलीसात सत्तावीस जुलैला गुन्याची नोंद करण्यात आली होती तेंव्हा पासुन नगरदेवळा पोलीस पो.नि. किसनराव नजन पाटील व पो.उपनिरीक्षक गणेश चौबे यांचे मार्गदर्शनाखाली तपास करीत होते. गौताळा वनविभागाच्या चौकशी चौकीतील सीसीटीवी कॅमेरे तपासले असता एक पीकप आढळून आली त्या आधारावर सहाय्यक फौजदार कैलास पाटील,ज्ञानेश्वर पाटील, हवालदार विनोद पाटील,मनोज पाटील, नरेंद्र शिंदे,मजीतखान पठाण,अमोल पाटील यांनी परिसरातुन त्या बाबतचा तपास करुन मिळालेल्या माहितीच्या आधाराव शुक्रवारी औरंगाबाद पोलीसांच्या सहकार्याने एम.एच.48 T 7663 ही पिकप व्हॅन ताब्यात घेत कालू उर्फ शेख मुक्तार शेख चांद (वय 27) रा.भिकापूर नायगाव ता.फुलंब्री जि.औरंगाबाद ह.मु. मुसीफ काॅलनी,कटकटगेट औरंगाबाद , सलमान रहेमान पठाण (वय22)साहिल काॅलनी जटवाडा रोड सारावैभव औरंगाबाद यांना अटक केली.शनिवारी पाचोरा पोलीसात हजर करुन पोलिस कोठडी देण्यात आली आहे. तर शेख अरबाज शेख जमील शेख रा.फाजलपूरा औरंगाबाद हा आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची चौकशी करुन पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.तर दोन आरोपी अद्याप फरार असुन त्यांना देखिल लवकरच ताब्यात घेऊन अटक केली जाणार आहे. पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.
अनेक गुन्ह्यांचा उकल होण्याची शक्यता : नगरदेवळा परिसरात गेल्या दोन वर्षांन पासुन अनेक गुरे चोरी गेले असुन संमंधीत गुन्हेगारांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्या थेट मुळाशी जाऊन या संपूर्ण टोळीच्या मुसक्या आवळल्या जाव्यात अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.


