आपल खान्देशब्रेकिंगराजकीय

आदित्य ठाकरे यांचा उत्तर महाराष्ट्र दौरा तडकाफडकी स्थगित!

झूम मराठी

जळगाव(झूम मराठी) शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असतात. तसेच आजदेखील ते महारष्ट्र दौऱ्यावर जाणार होते; परंतु आता त्यांचा महाराष्ट्र दौरा तडकाफडकी स्थगित झालेले समजत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. अनेक मातब्बर नेत्यांनी शिवसेनची साथ सोडली. तेव्हापासून ठाकरे पितापुत्रांनी पक्षाला नवसंजीवणी देण्यासाठी बैठकींचा आणि दौऱ्यांचा सपाटा लावलाय. तसेच, आदित्य ठाकरे रस्त्यावर उतरून शिवसैनिकांच्या भेटी घेतायेत.


तसेच बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून जनतेला संबोधित करतायेत. आतापर्यंत आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रेचे २ टप्पे पूर्ण केले आहेत. आता आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेचा तिसऱ्या टप्प्याला ९ ऑगस्टपासून सुरूवात होणार होती. यावेळी ते जळगाव ग्रामीण मतदारसंघातील बंडखोर आमदार गुलाबराव पाटील, आ किशोर आप्पा पाटील, आ चिमणराव पाटील यांच्या मतदार संघातही जाणार होते; परंतु आदित्य ठाकरे यांची तब्बेत बरी नसल्याने उद्या (९ जुलै) पासून सुरू होणारा उत्तर महाराष्ट्र दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. अशी माहिती जिल्ह्याचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी दिली आहे..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे