आपल खान्देशराजकीय

आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या बालेकिल्ल्यात येत्या मंगळवारी आदित्य ठाकरे, तोफ डागणार!..

मंगळवारी जिल्हा दौऱ्यावर : शिंदे गटात गेलेल्या आमदारांच्या मतदार संघाला प्राधान्य..


झूम मराठी वृत्त

 शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे मंगळवार, ९ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून पाचोरा सह धरणगाव व पारोळा येथे त्यांचा संवाद कार्यक्रम होणार आहे. मंगळवार सकाळी १०.१५ वाजता – जळगाव विमानतळावर आगमन. तेथून पाचोराकडे प्रयाण व सकाळी ११.२० वाजता पाचोरा येथे जनतेशी संवाद साधणार आहेत. काय बोलणार आहेत त्यावर लक्ष लागून आहॆ. कारण मागील 2019 विधानसभेची शिवसेना प्रचार यात्रेची सुरवात पाचोऱ्यातूनच आदित्य ठाकरे यांच्या उपस्थित झाली होती.

एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंची  साथ सोडल्यानंतर त्याच्या समवेत आमदार किशोर पाटील देखील शिंदे गटात सहभागी झाल्याने पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेना दुभंगली होती. पाचोरा भडगाव मतदार संघ आमदार किशोर पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यातच शिवसेना माजी आमदार स्व आर ओ पाटील यांच्या कन्या वैशालीताई राजकारणात सक्रिय झाले आहेत, शिवसैनिक जोमाने कामाला लागले आहॆत. पाचोरा भडगावातील एकनाथ शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरे, तोफ डागणार पाचोरेकरांची उत्सुकता शिंगेला पोहचली आहॆ.

शिंदे गटात गेलेल्या जिल्ह्यातील पाच आमदारांपैकी तीन आमदारांच्या मतदार संघातच हा कार्यक्रम होणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या संवाद यात्रेदरम्यान ९ ऑगस्ट अर्थात क्रांती दिनी ते जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांमध्ये राज्यातील इतर जिल्ह्यापेक्षा जळगाव जिल्ह्यातील आमदारांची संख्या सर्वाधिक आहे. यामध्ये जळगाव ग्रामीण (धरणगाव तालुका) मतदार संघाचे आमदार गुलाबराव पाटील, पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील, एरंडोल-पारोळा मतदार संघाचे आमदार चिमणराव पाटील, चोपडा मतदार संघाच्या आमदार लता सोनवणे, मुक्ताईनगर मतदार संघाचे अपक्ष मात्र शिवसेनेसोबत असलेले आमदार चंद्रकांत पाटील यांचा समावेश आहे. हे बंडखोर आमदार शिंदे गटासोबत गेल्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या जिल्हा दौऱ्यादरम्यान ते वरील पाच पैकी गुलाबराव पाटील, किशोर पाटील, चिमणराव पाटील यांच्या मतदार संघात क्रांतीदिनीच जनतेशी संवाद साधरणार आहे.

   आदित्य ठाकरे हे ९ रोजी मुंबई येथून सकाळी जळगाव विमानतळावर पोहचणार आहे. ते जळगाव शहरात येत असले तरी शहरात त्यांचा एकही कार्यक्रम नाही. शिंदे गटात गेलेल्या आमदारांच्या मतदार संघात संवाद साधायचा असल्याने भाजप आमदार असलेल्या जळगाव शहराला या दौऱ्यातून वगळण्यात आले आहे.


बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे