ब्रेकिंग

पाचोरा तालुका ओला दुष्काळ जाहीर करा, पाचोरा तालुका कांग्रेसची मागणी..

झूम मराठी वृत्त

पाचोरा (झूम मराठी) पाचोरा तालुक्यात पावसाची संततधार सुरू होती. पावसामुळे शेतीचे कामेही खोळंबली आहेत आणि त्यामुळे पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना त्वरित सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी पाचोरा काँग्रेस ने तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली असून यावेळी पाचोरा तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते.

पाचोरा काँग्रेसच्या वतीने तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा तहसिल कार्यालया समोर ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच शेतकऱ्यांना सरसकट अनुदान द्यावे अशा विविध घोषणाबाजी करत निवेदन देऊन आंदोलन करण्यात आले. विविध घोषणाबाजी करीत धरणे आंदोलन करण्यात आले.


लोकहितार्थ जाहिरात

यावेळी पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, युवक जिल्हा उपाध्यक्ष अंबादास गिरी, ओबीसी तालुका अध्यक्ष इरफान मनियार, शहराध्यक्ष शरिफ शेख, महिला जिल्हा काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस संगिता नेवे, कुसुम पाटील, सुनिता पाटील, कल्पना निंबाळकर, अमजद मौलाना, शिवराम पाटील, सय्यद ईसुफ टकारी, बिस्मिल्ला टकारी, शंकर सोनवणे, ललित पुजारी, जलील शहा, कल्पेश येवले, राहुल शिंदे आदींनी धरणे आंदोलन मध्ये उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे