आपल खान्देशमहाराष्ट्र

शेतकऱ्याला शिवीगाळ करणारा ‘तो’ मुजोर अभियंता अखेर निलंबित, छावा क्रांतिवीर सेनेचा दणका!

छावा क्रांतिवीर सेनेच्या निवेदनाला यश आले आहे. महावितरण अभियंता अभिनय बोरकर याला निलंबित करण्यात आले आहे. मात्र आम्हाला नुसते निलंबन नको, तर ३०७ अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही छावा क्रांतिवीर सेनेची आग्रही मागणी होती

नाशिक (प्रतिनिधी ): दिंडोरी येथील शेतकऱ्याला अत्यंत अश्लिल आणि अशोभनीय भाषेत शिवीगाळ करणारा एमएससीबीचा कनिष्ठ अभियंता अभिनय बोरकर याला अखेर निलंबित करण्यात आले आहे. एखाद्या सराईत गुंडालाही लाजवेल अशी भाषा असलेल्या या अभियंत्यावर आज दुपारी ३ वाजता निलंबनाची कारवाई केली आहे. या मुजोर अभियंत्याला तातडीने निलंबित करावे, अशी छावा क्रांतिवीर सेनेने मागणी केली होती. त्याचबरोबर शेतकऱ्यांना शिविगाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना जर पाठीशी घातले तर ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना नाशिकमध्ये पाय ठेवू देणार नसल्याचा आक्रमक पवित्रा छावा क्रांतिवीर सेनेने घेतला होता. अखेर प्रशासनाने छावा क्रांतिवीर सेनेच्या मागणीचा विचार करीत या मुजोर अभियंत्याला निलंबित केले आहे. मात्र अशातही त्याच्यावर जोपर्यंत ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आंदोलनाची धार तीव्रच ठेवणार असल्याची भूमिका संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी ‘लोकराष्ट्र’शी बोलताना व्यक्त केली आहे.

दिंडोरी येथील शेतकऱ्यांने लाइट बिलाचे पैसे भरूनदेखील वीज वितरण कंपनीकडून वीज प्रवाह सुरू केला जात नसल्याने, संबंधित शेतकऱ्याच्या शेतातील पिक धोक्यात आले होते. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याकडून, वीज प्रवाह लवकर सुरू करावा म्हणून, वीज वितरण कंपनीचा कनिष्ठ अभियंता अभिनय बोरकर याच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला जात होता. मात्र हा अभियंता शेतकऱ्याचे फोनही घेत नव्हता. जेव्हा त्या मुजोर अभियंत्याने फोन उचलला तेव्हा त्याने संबंधित शेतकऱ्याला धमकी देताना ‘तुला तलवारीने उभा कापून टाकेल, तु ये इकडे, तुला बघतो’ अशा भाषेत दम भरला. तसेच अत्यंत अश्लिल भाषेत शिविगाळ केली. संबंधित शेतकरी सातत्याने त्या अभियंत्याकडे विनवनी करीत होता. ‘साहेब पैसे भरले आहेत, लाइट जोडा, आमच्या शेतातील पिक करपून जाईल.’ मात्र हा मुजोर अभियंता त्या शेतकऱ्याला आई-बहिणीवरून शिविगाळ करीत होता. तसेच तुला कापून टाकेल अशा भाषेत धमकावत होता.

जेव्हा हा संपूर्ण प्रकार समोर आला तेव्हा सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात होता. छावा क्रांतिवीर सेनेने या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना निवेदन दिले होते. तसेच या अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करून त्याच्यावर ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती. यावेळी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनीच याप्रकरणी लक्ष केंद्रीत करावे, अशी भूमिकाही छावाने घेतली होती. दरम्यान, या छावाच्या या मागणीचा प्रशासनाने विचार करीत त्या मुजोर अभियंत्याला निलंबित केले आहे. मात्र जोपर्यंत त्याच्यावर ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला जाणार नाही. तोपर्यंत स्वस्त बसणार नसल्याचेही छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी स्पष्ट केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे