विदर्भ
पोलीस अधिकारी अनिल मुळे यांच्या कुटुबियांना न्याय मिळावा यासाठी लिंगायत धर्म महासभा व बसव बिग्रेड हिंगोली याचे वतीने निवेदन
निलेश पाटील
हिंगोली (प्रतिनिधी) आज रोजी उप विभागीय आधिकारी वसमत यांना फोजदार अनिल मुळे याना वरीष्ठ पोलिस अधिकारी यांनी वारवार त्रास देत होते हा त्रास सहन न झाल्यामुळे फोजदार अनिल मुळे PSI यांनी दि.13/8/2021रोजी आत्महत्या केली. हि आत्महत्या नसून वरीष्ठ पोलीस आधीकारी यानी पि एस आय अनिल मुळे याची हत्याच केली आहे मुळे कुटुबियांना न्याय मिळावा या साठी आज लिंगायत धर्म महासभा हिंगोली जिल्हा व बसव बिग्रेड हिंगोली याचे वतीने निवेदन सादर करण्यात आले हे निवेदन देण्यासाठी लिंगायत धर्म महासभा हिंगोली जिल्हाध्यक्ष श.गजानन विठ्ठल होनराव जि.सचिव मल्लिकार्जुन नरवाडे जिल्हा कार्यकारिणी सदस्य भाऊ देशमुख ,राणोजी देशमुख,शाम कोरे लक्षण सोनटक्के ,नागेश सोनटक्के ,व बसव बिग्रेड हिंगोली जिल्हा समन्वयक श.देविदास चपटे हे शरण उपस्थित होते


