आपल खान्देश

पाचोरा नगरपरिषद आपत्ती व्यवस्थापन पथकाची अतिवृष्टीने बाधीत झालेल्या भागात भेट


पावसाने संध्याकाळी सलग 3 तास झालेल्या पाचोरा शहरातील भिम नगर, जनता वसाहत, नागसेन नगर, हनुमान नगर,वाल्मिकी कॉलनी या भागात पुरसदृष्य परिस्थिती निर्माण होऊन नागरीकांच्या घरात, दुकानात मोठया प्रमाणात पाणी शिरल्याने आज आमदार किशोर पाटील, मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर, उद्योजक मुकूंद अण्णा बिल्दीकर, कंत्राटदार मनोज शांताराम पाटील, प्रविण ब्राम्हणे, उपमुख्याधिकारी दगडू मराठे, बांधकाम अभियंता ईश्वर सोनवणे, मधुकर सुर्यवंशी तसेच आपत्ती व्यवस्थापन पथकातील कर्मचारी आरोग्य् विभागाचे मुकादम, कर्मचारी यांनी सकाळी भेट दिली.

प्रभावीत भागाची पाहणी करण्यात आली व नगरपालिकेकडून या भागातील पाणी पाहून जाण्यासाठी नाले, गटारी त्वरीत बांधण्याबाबत आमदार किशोर पाटील यांनी सुचीत केले असता त्वरीत या भागातील नाले व गटारी बांधण्याबाबत बांधकाम अभियंता यांना मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीमती शोभा बाविस्कर यांनी आदेशीत केले. या भागातील गटारी व नाल्यांचा प्रलंबित विषय मार्गी लागणार असल्याचे आश्वासन दिल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी न.पा.अधिकारी कर्मचारी, स्चव्छता विभागाचे कर्मचारी व परिसरातील नागरीक उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे