ब्रेकिंग

बेधुंद ट्रकचालकाने आठ जणांना उडवले..

तिघांचा जागीच मृत्यू; एक अत्यवस्थ स्थानिक तरुणांनी ट्रकचालकाला पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात

 

रायगड जिल्हा प्रतिनिधी

रोहा > रेवदंडा येथील जेएसडब्ल्यू कंपनी येथून रोह्याकडे येणार्‍या ट्रकच्या चालकाने बेधुंदपणे गाडी चालवत रेवदंडा ते चणेरापर्यंत आठ जणांना उडवल्याची धक्कादायक घटना आज (३१ मार्च) घडली आहे. यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, 1 महिला अत्यवस्थ आहे. तर प्राथमिक माहितीनुसार आणखी चारजण जखमी आहेत

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रेवदंडा बाजूकडून एमएच04 ई वाय 8501 या ट्रकच्या चालकाने बेधुंदपणे गाडी चालवत साळाव, आमली येथे प्रत्येकी एका व्यक्तीला, तर चेहेर येथे दोन व्यक्तींना ठोकर मारुन जखमी केले. त्यानंतर भरधाव वेगाने गाडी रोहा बाजूकडे चालवत नेली. पुढील गावात सदर घटनेची खबर मिळताच स्थानिकांनी सदर ट्रक अडविण्याचा प्रयत्न केला असता या ट्रकचालकाने अनेक गाड्या व अडथळे उडवून लावत न्हावे फाटानजीक एका जोडप्याला व त्यांच्या लहानग्या मुलाला उडवले.

यामध्ये जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक लक्ष्मण ढेबे व त्यांचा मुलगा यांचा जागीच मृत्यू झाला असून, त्यांच्या पत्नीचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. सदर धडक इतकी जोरात होती की अपघातग्रस्त शिक्षकाच्या गाडीचा चक्काचूर झाला असून गाडी सुमारे चारशे मिटर फरफटत गेली आहे. त्यानंतर सदर चालकाने सारसोली गावाच्या पुढे चणेरा येथील नागरिक उदय वाकडे यांना ठोकरल्याने त्यांचादेखील जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव वेगाने ट्रक चालवणार्‍या या चालकाला चांडगावनजीक स्थानिक युवकांनी धाडसाने पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे