आपल खान्देशमहाराष्ट्रराजकीय

पाचोरा-भडगावला लाल दिव्याची गाडी मिळणार ?

दिलीप जय परदेशी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी असलेले पाचोरा भडगावातील आमदार किशोर पाटील हयांचे आज पाचोरा शहरात आगमन झाले त्यांचे स्वागत करण्यात आले.लोकप्रिय व्यक्तिमत्व आमदार किशोर आप्पा पाटील यांना लाल दिव्याची गाडी मिळणार म्हणून कार्यकर्ते आनंदी झाले आहेत.

महाविकास आघाडी कोसळल्यानंतर राज्यात भाजप व शिंदे सरकार सत्तेवर आला आहे. अनेक राजकिय घडामोडी नंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व देवेंद्र फडणविस उपमुख्यमंत्री म्हणुन शपथ घेतले आहे. मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस है उपमुख्यमंत्री झाले. मात्र सध्या जोरदार चर्चा आहे मंत्रीपद कोणाला मिळणार? पाचोरा भडगाव तालुक्यातील लोकप्रिय व्यक्तिमत्वआमदार किशोर आप्पा पाटील यांचे कार्यकर्ते आशा बाळगुन आहेत. मंत्री पद मिळावे यासाठी मागच्या आठवडयात आमदाराच्या समर्थनात रॅली काढली होती.पाचोरा भडगाव तालुक्यातील लोकप्रिय व्यक्तिमत्व आमदार किशोर आप्पा पाटील यांना लाल दिव्याची गाडी मिळणार?

आमदार किशोर आप्पा पाटील विकासाचे महामेरू म्हणून आमदार नावारूपास आले आहे. तळागाळातील नागरिकांचे प्रश्न अनेक वेळा विधानसभेत मांडले आहेत. त्यामुळे अल्पकाळात विधानसभेत विकासाबाबत आवाज उठविणार आमदार म्हणुन परिचित झाले आहेत. त्याच प्रमाणे वरिष्ठ पातळीवर देखील चांगले संबंध आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार किशोर पाटील यांची जवळीक आहेत. अनेक वेळा मुख्यमंत्री शिंदे पाचोऱ्यात आले आहेत. तालुक्याच्या विकासासाठी निधी या नेत्यांकडून आणले आहेत, सर्वांना बरोबर घेवून काम करण्याची कौशल्य या मुळे एक लोकप्रिय आमदार म्हणून नावारूपास येत आहेत. या कामाला जर लाल दिव्याची गाडी मिळल्यास आगामी २०२४ ला होणाऱ्या या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत तालुक्यातील आप्पांचे आणखिनच वर्चस्व वाढणार असल्याचे भावना कार्यकत्यांतुन व्यक्त होत आहे.यांच्या नावाची विचार होणार याकडे लक्ष लागून आहे.

मागील दोन महिन्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांचे पाचोऱ्यात श्री राम मंदिर येथे अचानक आगमन झाले होते. मुख्यमंत्री शिंदे यांचे मुख्यमंत्री पदाचे भविष्य येथेच पाहण्यात आले होते? अशी चर्चा खूप रंगत असते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाचोरा येथील विविध विकास कामांचे लोकार्पण समारंभास आले असता, आ. किशोर आप्पा पाटील यांचे कामा बद्दल समाधान व्यक्त केले होते. त्यांच्या कार्याची स्तुति केले होते. त्यामुळे तालुक्यातील आप्पांचे कार्यकर्ते आशावादी बनले आहेत. आत्मविश्वासाने सांगत आहेत की, लाल दिव्याची गाडी पाचोरा भडगाव मतदार संघाला मिळेलच  हे जरी जर तर ची गोष्ट असले तरी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी देखील जबरदस्त फिल्डींग लावली असेल अशी चर्चा आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे