आपल खान्देशआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

नॅशनल अबॅकस स्पर्धेत पाचोऱ्याच्या वेदीकस इंटरनॅशनल अकॅडमी चे दैदिप्यमान यश..


झूम मराठी न्यूज नेटवर्क

पाचोरा (प्रतिनिधी) संभाजीनगर( औरंगाबाद) येथे 3 जुलै रोजी पार पडलेल्या प्रोऍक्टिव्ह अबॅकस नॅशनल समर कॉम्पिटिशन (नॉर्थ झोन) 2022 या स्पर्धेमध्ये वेदीकस अबॅकस चे 4 विद्यार्थी राज्यातुन ट्रॉफी विनर ठरले. 6 मिनिटांत 100 गणिते सोडविणे असे स्पर्धेचे स्वरूप होते. या स्पर्धेत-राज्यातून राधिका धरममसिंग परदेशी ( क्रमांक- तिसरा),तनुश्री प्रविण चौधरी( क्रमांक- तिसरा),कीर्ती दिपक पाटील ( क्रमांक- पाचवा),कृष्णा चुडामन पुजारी( क्रमांक – पाचवा) हे विद्यार्थी विजेतेपदाचे मानकरी ठरले. तसेच सहभागी स्पर्धकांना आकर्षक ट्रॉफी देण्यात आली. सदर स्पर्धेत नाशिक, अहमदनगर, जालना, संभाजीनगर,बीड, नांदेड, उस्मानाबाद, जळगाव,ठाणे, धुळे, नंदुरबार, उस्मानाबाद, लातूर, बुलढाणा, हिंगोली, मधील 1250 स्पर्धकांनी भाग घेतला होता.

सदर कार्यक्रमास श्री राजेंद्र लोचानी,स्नेहा लोचानी श्री अजय मणियार,गिरीष करडे,सारिका करडे,तेजस्विनी सावंत डायरेक्टर प्रोऍक्टिव्ह अबॅकस मुंबई हे उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना वेदीकस अबॅकसचे संचालक श्री रविंद्र पाटील सर व श्रीमती सपना शिंदे मॅडम यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे