आपल खान्देशगुन्हेगारी

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची कौतुकस्पद कामगिरी.. दुचाकी चोरास केले जेरबंद!

दुचाकी गाड्यांची चोरी करणाऱ्या एका चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात पिंपंळगाव पोलिसांना यश आलं आहे

झूम मराठी वृत्त

पाचोरा (झूम मराठी) तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनअंतर्गत पोलीसांच्या पथकाने धडाकेबाज कामगिरी करीत मोटार सायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्या कडून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

यावेळी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की  पिंपळगाव येथील रमेश दत्तात्रय वाघ यांची मोटार सायकल MH 19 CP 2256 ही दिनांक 23/06/2022 रोजी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरासमोरून चोरून नेली होती सदर बाबत पिंपळगाव पोलिस स्टेशन ला गु.र.न. 162/2022 भा.द.वि. 379 नुसार दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास पो.ना.2572 रवींद्र पाटील हे करीत होते त्यांनी पो.हवा. 2658 रणजीत पाटील, पो. कॉ. 476 पंकज सोनावणे,पो.कॉ. 1403 मनोज बडगुजर, पो. कॉ .964 संभाजी सरोदे यांच्या मदतीने सदर गुन्ह्यातील आरोपी चेतन उर्फ सोनू भोई यास पिंपळगाव हरे येथून सदर गुन्ह्यात अटक करून त्याचे कडून सदर गुन्ह्यातील मोटार सायकल शिवना येथून हस्तगत केली आहे. सदर कारवाई मा. पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, डी.वाय.एस.पी. भारत काकडे, स.पो.नी. महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पो.ना रवींद्र पाटील हे करीत आहे.

नागरिकांनी कोणतीही दुचाकी किंवा चारचाकी गाडी खरेदी करताना त्या वाहनाचा आधी झालेला व्यवहार, गाडी मालकाचे आधारकार्ड, पॅनकार्ड, इतर सर्व कायदेशीर कागदपत्रे तपासूनच गाडी खरेदी करावी, असं आवाहन पिंपळगाव पोलीस ठाण्याचे स.पो.नी. महेंद्र वाघमारे यांनी केले आहे. 


बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे