आपल खान्देशगुन्हेगारी

चाळीसवर्षीय महिलेला जबरदस्तीने शेतात नेऊन केला अमानुष अत्याचार! गुन्हा दाखल

झूम मराठी वृत्त

पाचोरा तालुक्यातील एका गावातील चाळीसवर्षीय महिलेला जबरदस्तीने शेतात नेऊन केला अमानुष अत्याचार केल्या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर येथे गुन्हा दाखल केला गेला.

महिलेला दुचाकीवर जबरदस्तीने बसवून शेतात नेत तोंडात बोळा कोंबून अमानुष अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढेच नाही तर नराधमाने अत्याचार केल्याचा व्हिडीओ देखील बनविला असल्याची तक्रार पिडीत महिलेने दिली आहे. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील एका गावात ४० वर्षीय महिला तिचा भाऊ व मुलासह वास्तव्याला आहे. ५ जून रोजी रात्री ९ वाजता महिला घरी एकटी असतांना संशयित आरोपी आबा अंबादास कोळी रा.घोसला ता.सोयगाव जि.औरंगाबाद हा दुचाकीवर येवून तुला तुझ्या बहिणीच्या घरी सोडतो असे सांगितले.

याला नकार दिल्याने शिवीगाळ करून तुझ्या भावासह मुलाला मारून टाकण्याची धमकी देत तिला दुचाकीवर जबरी बसवून घेवून गेला. संशयित आरोपीने सोयगाव शिवरात शेतात नेवून तोंडात कापडाचा बोळा कोंबून अत्याचार केला. एवढेच नाही तर अत्याचाराचा व्हिडीओ देखील बनविला. याप्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी आबा आंबादास कोळी याच्या विरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ऐ पी आय महेंद्र वाघमारे व सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे करीत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे