पाचोरा निर्मल इंटरनॅशनल स्कूलमधील कलाशिक्षक शैलेश कुलकर्णी यांची शनिवारी सह्याद्री वाहिनीवर मुलाखत
ZOOM MARATHI NEWS MEDIA
निर्मल इंटरनॅशनल स्कूल (सी.बी.एस.ई.) पाचोरा येथील कला शिक्षक शैलेश कुलकर्णी यांची काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या लाडक्या सह्याद्री वाहिनीवरील “बियॉंड द थॉट” या सुप्रसिद्ध कार्यक्रमासाठी रांगोळीकार म्हणून निवड झाली होती.
या मध्ये त्यांच्या कलाकृती व त्या कलाकृतीं चा प्रवास सांगितलेला आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दिनांक २० नोव्हेंबर २०२१ वार शनिवार या दिवशी सायंकाळी ७.३० वाजता तसेच रात्री १० वा. व पुनः प्रक्षेपण २१ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी १.३० वा. होणार आहे. खान्देशातून या कार्यक्रमासाठी निवड होणारे ते सर्वप्रथम कलाकार होय हे विशेष. कलाशिक्षक शैलेश कुलकर्णी हे सर जे जे कला महाविद्यालय मुंबई येथील माजी विद्यार्थी असून खान्देशातील प्रसिद्ध रांगोळीकार म्हणून सर्वपरिचित आहे. घरापुढील काढली जाणारी रांगोळी एका कलाकाराला राष्ट्रीय पातळपर्यंत घेऊन जाऊ शकते , हे आपल्याला कळते. त्यांना आता पर्यंत बऱ्याच पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे तसेच त्यांनी विविध राज्य, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळाली असून रांगोळी कले बरोबर त्यांनी चित्रकलेमध्ये देखील राष्ट्रीय स्तरावर विशेष प्रावीण्य प्राप्त केले आहे.या प्रविण्याबाबत संस्थेच्या अध्यक्षा सौ.वैशाली सुर्यवंशी,सचिव श्री. नरेंद्रसिंग सुर्यवंशी,शालेय शिक्षण संचालक डॉ.भगवान सावंत,प्राचार्य श्री. गणेश राजपूत , उपप्राचार्य श्री. प्रदिप सोनवणे आणि प्रशासकीय अधिकारी श्री. संतोष पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.



