पाचोरा तालुक्यातील गाळण शिवारात वीज कोसळल्याने शेतकरीचा मृत्यू..
झूम मराठी
पाचोरा तालुक्यातील गाळण बु: येथील शेतकरी कैलास बारकु पाटील वय 46 वर्षे शेतात कपाशी लावणी साठी काम सुरु असताना सध्याकाळी 6 वा सुमारास वादळ आणि पावसासह वीजेचा कडकडाट सुरू झाला. कैलास पाटील यांच्या बाजूलाच अचानक वीज पडल्याने कैलास बारकु पाटील हे शेतातच मृत्युमुखी पडले, पाचोरा गाळण रस्त्यावर आणि शेतशिवारात अनेक झाडे वादळामुळे पडले असुन काही ठिकाणी रस्ते बंद झाले आहेत, कैलास पाटील हे सकाळपासुन स्वपत्नीसह शेतात गेले होते, अचानक वारा आणि पाउस सुरु झाल्यामुळे त्यांची पत्नी काही अंतरावर शेतातील झाडाखाली उभ्या होत्या. पण काळाचा घाला कैलास पाटील यांच्यावर आला!पत्नीसमोर पतीचा मृत्यु झाला नंतर कैलास पाटील यांना पाचोरा ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता!वैद्यकिय अधिकारी यांनी मृत घोषीत केले मयत कैलास पाटील याच्यां पश्चात पत्नी तीन मुली असुन तीनही मुलीच लग्न झाले असुन एक मुलगा नाशिक येथे शिक्षणासाठी गेलेला आहे!काळाने अचानक घाला घातल्यानंतर पाटील यांच्या परिवारात अतिशय दुखःद घटना घडली आहे!


