महाराष्ट्र

राहुल परदेशी यांची विमुक्त घुमंतू जनजाती विकास परीषद संघटनेच्या प्रदेश प्रसिध्दी प्रमुखपदी वर्णी

राहुल परदेशी हे युवा समाजसेवक असून भटक्या विमुक्तांच्या समस्या सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात

 झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया

नाशिक (प्रतिनिधी) भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांसाठी कार्य करणारे युवा कार्यकर्ते राहुल परदेशी यांची विमुक्त घुमंतू जनजाती विकास परिषद या देशभरातील भटक्या विमुक्तांच्या अखिल भारतीय स्तरावरील संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश मिडीया प्रकोष्ट संयोजक या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

राहुल परदेशी हे युवा समाजसेवक असून भटक्या विमुक्तांच्या समस्या सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची प्रदेश प्रसिद्धीप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविलेले दादासाहेब भिकूजी इदाते हे या संघटनेचे संस्थापक असून लक्ष्मीनारायण लोधी हे राष्ट्रीय अध्यक्ष तर अनिल फड हे राष्ट्रीय कार्यवाह आहेत. दादा इदाते हे केंद्र सरकारने नेमलेल्या इदाते आयोगाचे माजी अध्यक्ष असून केंद्र सरकारच्या विमुक्त घुमंतू कल्याणकारी बोर्डाचेदेखील माजी अध्यक्ष आहेत. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भटक्या विमुक्तांसाठी वाहून घेतल्याने त्यांना पद्मश्री सन्मान प्राप्त झाला आहे.दि.११ मार्च २०२३ रोजी नाशिक येथील मंजुळा मंगल कार्यालयात झालेल्या प्रदेश कार्यकारीणीच्या बैठकीत राहुल परदेशी यांची नियुक्ती जाहीर‌ करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष देविदास राठोड, पद्मश्री दादा इदाते, आनिल फड यांच्या हस्ते राहुल परदेशी यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातील बहुसंख्य जिल्ह्यातून भटक्या विमुक्त परीषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.

विमुक्त घुमंतू जनजाती विकास परीषद ही अखिल भारतीय स्तरावरील संघटना असून मला दिलेल्या जबाबदारीची मला जाणीव आहे. भटक्या विमुक्तांच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी माझ्या प्रसिद्धीप्रमुख पदाचा उपयोग करेन अशी प्रतिक्रिया राहुल परदेशी यांनी नियुक्तीनंतर दिली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे