आपल खान्देश

प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष योगेश पवार यांचे जिल्हा परिषदे समोर थाळी नाद आंदोलन


झूम मराठी वृत्तसेवा

अंमळनेर (झूम मराठी) शासन नियमा नुसार अपंगाना दिला जाणारा पाच टक्के निधि या निधीमध्ये अफरा तफर केली तसेच दिव्यांगांना मिळणाऱ्या सवलती न पासुन दिव्यांग बांधवांना वंचित ठेवले तसेच अपंग बांधवांना शासकिय स्तरावरून दिल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ दिला जावा असे निवेदन वारंवार देऊनही न्याय मिळत नसल्याने प्रहार संघटनेचे पदाधिकारी व अपंग बांधव यांनी आज जिल्हा परिषदे समोर थाळी नाद आंदोलन केले.

अंमळनेर तालुक्यातील दहिवद येथील तत्कालीन ग्राम विकास अधिकारी यांनी शासन नियमा नुसार अपंगाना दिला जाणारा पाच टक्के निधि या निधीमध्ये अफरा तफर केली तसेच दिव्यांगांना मिळणाऱ्या सवलती न पासुन दिव्यांग बांधवांना वंचित ठेवले तसेच अपंग बांधवांना शासकिय स्तरावरून दिल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ दिला जावा असे निवेदन वारंवार देऊन सुधा तात्कालीन ग्रामसेवक अधिकारी हे मनमानी कारभार करत आहे ह्या विषयी गटविकास अधिकारी यांच्या कडे तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवक संजीव साहेबराव सैदाणे यांची पाठराखण केली व कुठली ही ठोस कार्यवाही केली नाही अखेरीस योगेश पवार तालुका अध्यक्ष प्रहार अपंग क्रांती संघटना अमळनेर, प्रहार संघटना जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील, पाचोरा संगीता पाटील, प्रविण काटे, नुरखान पठाण,प्रदीप सोनवणे व प्रहार संघटनेचे पदाधिकारी व अपंग बांधव यांनी आज जिल्हा परिषदे समोर थाळी नाद आंदोलन केले

आता तरी प्रशासन जागे होइल का आम्हां अपंग बांधवांना वर होणाऱ्या अन्याला प्रशासन न्याय देईल का अशा हुकूम शाही ग्राम विकास अधिकारी यांना निलंबित करा अशी आशयाची मागणी संघटनेने लावून धरली आहे ह्या वेळी अमळनेर तालुक्यातील पदाधिकारी व अपंग बांधव मोठया संख्येने उपस्थित होते, शेवटी उपमुख्य कार्यकारी अधिकारी दी रा लोखंडे यांनी अमळनेर चे नवीन गटविकास अधिकारी यांना शिस्तभंगाची कारवाई करून जिल्हा परिषदेस अहवाल सादर करावा असे लेखी आश्वासन देवून आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती करून आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे