आपल खान्देशकृषीवार्ता

पाचोऱ्यात हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत हवामान विषयी केले मार्गदर्शन

झूम मराठी वृत्तसेवा

पाचोरा(झूम मराठी) पाचोरा शहरातील वृंदावन हॉस्पिटल येथे प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधत हवामानविषयी मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर स्थानिक आमदार किशोर आप्पा पाटील, थोरात साहेब, नानासाहेब प्रकाश पाटील संचालक डॉ विजय पाटील, डॉ नीलकंठ पाटील उपस्थित होते.

पाचोरा भडगाव तालुक्यात 7 जून ला मान्सून दाखल होणार असा अंदाज लावला

आज पाचोरा शहरात प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांच्या अनेक हिताच्या गोष्टींची माहिती दिली. शेतकऱ्याबाबतचे त्यांचे अंदाज नेहमीच बरोबर ठरत असल्याचा विश्वास डख यांनी व्यक्त केला.“ मी शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने अभ्यास करतो म्हणून मला ढग दिसतात. माझे अंदाज तंतोतंत खरे ठरतात. शासनाच्या हवामान तज्ञांकडे आभ्यासासाठी मशिनरी आहेत तशा माझ्याकडे कमी आहेत. पण मी शेतकऱ्यांच्या हितासाठी अभ्यास करतो.” असे सांगत सर्व मुद्दे स्पष्ट करत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

आमदार किशोर पाटील यांनी पंजाबराव डख यांचे कौतुक केले पंजाबराव डख ह्यांचे हवामान अंदाज  तंतोतंत खरे ठरतात. डख यांनी वर्तविलेल्या पावसाच्या अंदाजाचा मोठा फायदा महाराष्ट्रभर होतो तसेच तालुक्यातील शेतकरी थोडया प्रमाणात आल्याने शेतकऱ्यांविषयी खंत व्यक्त केली. शेतकऱ्यांनी आपली परंपारिक शेती करीत असताना शेती नाहीतर व्यवसाय म्हणुन बघायला हवे. शेती करत असताना नियोजनबद्ध करावी. तालुक्यातील शेतकरीना मागील वर्षी वादळं आणि पावसाचा खूप त्रास सहन करावा लागला आ. किशोर पाटील व्यक्त केले तसेच डॉ. नीलकंठ पाटील यांनी आपले शेती विषय प्रेम व्यक्त केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे