आपल खान्देशमहाराष्ट्रराजकीय

मराठा आरक्षणासाठी 16 जून पासून आंदोलन, संभाजीराजेंनी रायगडावरील घोषणा…

आज 6 जून अर्थात राज्याभिषेक दिन. आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. दरवर्षी हा दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाही त्याच पद्धतीने राज्यातील जनता हा दिन उत्साहात साजरा करत आहे. मात्र, यंदा या राज्याभिषेक दिनाला मराठा आरक्षणाच्या मागणीची किनार आहे.

 येत्या 16 जून 2021 पासून खासदार संभाजी भोसले हे राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळा पासून आंदोलनाची सुरुवात करणार

-खासदार संभाजीराजें

त्यानुसार आज त्यांनी राजगडावरुन बोलताना राज्य सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला आहे…

“राजसदरेवरुन बोलतोय, तुम्ही समाजाचा खेळ केला तर आम्ही गप्प बसणार नाही. मी संयमी आहे, आजपर्यंत सहन केलं पण आता मी गप्प बसणार नाही, काय होईल ते होईल.” असा इशारा देत त्यांनी “रायगडावरुन आतापर्यंत नेहमी सामान्यांचे विषय मांडले, कोणताही राजकारणाचा मुद्दा मांडला नाही. ज्या शिवाजी महाराजांनी बहुजनांसाठी स्वराज्य निर्माण केलं, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं. त्यांच्याच राज्यात आज मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी झगडावं लागतंय हे दुर्दैव आहे.’’ अशी खंत बोलून दाखवली.

16 जून ला होणाऱ्या आंदोलनानंतर देखील मागण्या मान्य झाल्या नाही तर… पुणे ते मुंबई लॉगमार्च काढू असा इशाराच खासदार संभाजीराजेंनी दिला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे