आपल खान्देश

पं.स.अमळनेर च्या भोंगळ कारभारानिषेधार्थ जि.प.कार्यालयावर दिव्यांगाचे थाळीनाद आंदोलनाचा इशारा…

जळगाव जिल्हा परिषद कार्यालयावर दिव्यांगांचे थाळीनाद आंदोलन करण्यात येणार प्रहार अपंग क्रांती संघटनेकडून करण्यात आली

झूम मराठी वृत्तसेवा

अंमळनेर (झूम मराठी ) तालुक्यात दिव्यांग ५% निधीच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत नसल्याने अमळनेर तालुक्यातील काही ग्रामपंचायतीत अजूनही ५% निधी वाटप करण्यात आलेला नाही.

जिल्ह्यात काही ग्रा.पं.मध्ये वाटप करण्यात आला परंतु त्यात अनेक घोळ करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी प्रहार अपंग क्रांती संघटनेकडून करण्यात आली होती. पण या कारवाई पासून पंचायत समिती प्रशासन घोळ करणाऱ्या व्यक्तींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला असल्याने संघटनेकडून करण्यात आलेली मागणी मान्य न झाल्यास दि.६ जून २०२२ रोजी जिल्हा परिषद कार्यालयावर दिव्यांगांचे थाळीनाद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष योगेश पवार, जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी दिली आहे. झोपलेल्या प्रशासनाला जाग यावी म्हणून प्रहार स्टाईलने आंदोलन छेडण्यात येणार असून या आंदोलनात मुख्य कार्यकारी अधिकारी यांना साळी चोळी चा आहेर देखील भेट देणार येणार असल्याची माहिती प्रहार संघटना अमळनेर यांच्याकडून मिळाली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे