आपल खान्देशकृषीवार्ता

पाचोरा शहरात वृंदावन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांना हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख करणार मार्गदर्शन..

झूम मराठी वृत्तसेवा

हवामानाचा अंदाज सांगुन शेतकऱ्यांना जागृत करून त्यांचे नुकसान टाळण्यासाठी अवघ्या काही मिनिटांत ३ कोटी लोकांपर्यंत हवामानाचा अंदाज सांगणारे पंजाबराव डख हे आज कोट्यावधी शेतकऱ्यांचे हितचिंतक बनले आहेत.

पाचोरा (झूम मराठी) हवामानाचा अंदाज सांगुन शेतकऱ्यांना जागृत करून त्यांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी कोणते पीक घ्यावे, पाऊस कसा होईल, मार्गदर्शनासाठी वृंदावन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पाचोरा येथे गुरुवारी २ जुन रोजी येऊन शेती आणि हवामानाचा अचुक अंदाज वर्तवणारे  तज्ज्ञ पंजाबराव डख मार्गदर्शन करणार आहे.आपण सर्वच आतुरतेने वाट पाहत आहोत की पाऊस पडण्यास कधी सुरूवात होईल. पण अचुक माहिती मिळत नाही म्हणुनच पाचोरा येथील वृंदावन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. निळकंठ नरहर पाटील यांनी पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकरी बांधवांना अचुक माहिती मिळावी म्हणून वृंदावन हॉस्पिटल मध्ये हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांना आमंत्रित केले आहे. डख हे पाचोरा येथील वृंदावन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शेतकरी बांधवांना मागदर्शन करण्यासाठी गुरूवार, २ रोजी सकाळी १० वा. उपस्थित राहणार आहे. पंजाबराव डख हे पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकरी बांधवांसोबत संवाद साधणार आहेत. या वर्षी कोणते पिके कोणत्या महिन्यात घ्यावे, २०२२ वर्षी पाऊसाचे प्रमाण कसे असेल या विषयावर संवाद साधणार आहेत. तरी पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पाचोरा येथील वृंदावन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ निळकंठ नरहर पाटील यांनी झूम मराठी मीडियाला सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे