आपल खान्देशमहाराष्ट्र

केंद्रानंतर राज्याने देखील दिली गुड न्यूज, राज्याच्या करकपातमुळे पेट्रोल-डिझेल होणार ‘इतके’ स्वस्त

झूम मराठी न्यूज नेटवर्क

पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने होरपळून निघणाऱ्या जनतेला शनिवारी केंद्र सरकारने दिलासा देत पेट्रोल आणि डिझेलवरील  अबकारी कर (Tax) कमी केला. त्यामुळे पेट्रोल 9.50 रुपयाने तर डिझेलचे दर 7 रुपयांनी स्वस्त झाले. केंद्रापाठोपाठ आता महाराष्ट्रातील ठाकरे सरकरने देखील पेट्रोल डिझेलवरील मूल्यवर्धित कर (VAT) कमी केला. त्यामुळे राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्य शासनाने आज 22 मेपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात ( VAT) अनुक्रमे 2 रुपये 8 पैसे आणि 1 रुपया 44 पैसे प्रती लिटर कपात केली आहे. यामुळे वार्षिक सुमारे 2500 कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे.

मूल्यवर्धित कर कमी केल्याने पेट्रोलकरिता 80 कोटी रुपये महिन्याला आणि 125 कोटी रुपये डिझेलकरिता इतके महसुली उत्पन्न कमी होणार आहे. 16 जून 2020 ते 4 नोव्हेंबर 2021 या कालावधीत केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे 7 रुपये 69 पैसे आणि 15 रुपये 14 पैसे प्रती लिटर कर आकारत होते. मार्च आणि मे 2020 मध्ये केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी दरात अनुक्रमे 13 आणि 16 रुपये अशी वाढ केली होती.

राज्याच्या कर कपातीनंतर आता जळगावमध्ये पेट्रोलचा प्रति लिटरचा दर ११०.११ रुपयावर येईल. तर डिझेलचा प्रति लिटरचा दर ९५.९ रुपयात येईल. यापूर्वी दोन दिवसाआधी पेट्रोल १२१.६९ इतके होते. तर दुसरीकडे डिझेलचा दर १०४.३४ रुपये इतका होता. मात्र दोन दिवसात पेट्रोल ११ रुपयांहून अधिकने स्वस्त झाले आहे. तर डिझेल ८ रुपयापर्यंत स्वस्त झाले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे