आपल खान्देश

कळमसरा येथील अवघ्या १२ वर्षाच्या मुलीवर गावगुंडांनी लैंगिक अत्याचार केल्याच्या निषेधार्थ, जळगाव येथे आंदोलन करून दिले निवेदन


  राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चा,बामसेफ,बहुजन क्रांती मोर्चा,भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा जळगाव जिल्हा शाखांनी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे केले आंदोलन 

जळगाव (झूम मराठी) जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथील अनु.जातीच्या अवघ्या १२ वर्षाच्या मुलीवर गावगुंडांनी लैंगिक अत्याचार केल्याच्या निषेधार्थ व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी,फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्यात यावा , पिडित मुलीला शासनाने आर्थिक मदत करुन कुटुंबाचे पुनर्वसन करावे,अल्पवयीन आरोपीची रिमांड होम मध्ये रवानगी करण्यात यावी,व पिडित कुटुंबाला संरक्षण द्यावे या मागण्यांसाठी आंदोलन करुन मागण्यांचे निवेदन मा.निवासी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

आंदोलनात सुमित्र अहिरे (राज्य कार्याध्यक्ष बामसेफ), रविंद्र सोनवणे (मिडिया जिल्हा प्रभारीं RMBKS),आनंद जाधव(जिल्हा कार्याध्यक्ष बामसेफ),अरुण म्हस्के(RMBKS Bhusawal zone), अमजदभाई रंगरेज (जिल्हा अध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी), डॉ.शाकीर शेख(जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा),राजेंद्र खरे(जिल्हा संयोजक बहुजन क्रांती मोर्चा),गणेश काकडे(जिल्हा प्रभारी राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चा),मुकेश सावकारे (जिल्हा अध्यक्ष भारतीय विद्यार्थी मोर्चा),सोपान भवरे(राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चा), नंदलाल खंडारे(जिल्हा मिडिया प्रभारीं),देवानंद निकम(जिल्हा कार्याध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा),अजित भालेराव (भारत मुक्ती मोर्चा),सुकलाल पेंढारकर (तालुका अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा),सुनिल देहाडे(शहर संयोजक बहुजन क्रांती मोर्चा),कुंदन तायडे,संतोष ठोकळ,गजानन नरवाडे,राजु जोहरे,(सर्व बहुजन क्रांती मोर्चा), आदि बामसेफ व सहयोगी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला. 

राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चा जळगाव जिल्हा शाखेने म.जिल्हाधिकारी व म.पोलीस अधिक्षक जळगाव यांना निवेदन देऊन पिडितेला न्याय मिळवुन देण्याची केली मागणी. 

संजय वानखेडे, सुनिल मोरे,कमलाकर सावकारे,संदीप ठोसर,व्ही.डी.सावकारे,निवृत्ती सुर्यवंशी, अविनाश वानखेडे,किशोर सोनवणे,संदीप शेकोकार,प्रकाश बाविस्कर, बाबुलाल तायडे,कैलास वाघ,राजु सोनवणे, मोतीलाल पवार, शशिकांत सावकारे,विलास सपकाळे,निलिमा सपकाळे आदि राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्च्याच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन केले..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे