पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील “मौत का कुंआ” कुंभकर्णी प्रशासन कधी होणार जागे?
पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील “मौत का कुंआ” कुंभकर्णी प्रशासन कधी होणार जागे
पाचोरा शहर एकीकडे आपली कात टाकत एक स्मार्ट सिटी होऊ पाहत आहॆ, काँकरीटचे चाकचक रस्ते भूमिगत गटारी अश्यातच भडगाव हायवेवरील कृष्णा दर्शन रोडाच्या मधोमध धोकेदायक विहिरी सारखे गटारीचे चेंबर उघडेच आहॆ म्हणून येणारे जाणारे त्याला “मौत का कुंआ” म्हणतात. या भूमिगत गटारीच्या चेंबरचे झाकण त्वरित बसवावे अशी मागणी होत आहे.
हा रोड वरदडीचा आहॆ, त्या भूमिगत गटारीचे झाकण गेल्या एक ते दीड महिन्या पासून तुटून खाली पडले आहॆ. हे रस्त्याच्या मधोमध एका धोकेदायक विहिरी सारखे उघडेच आहॆ म्हणून लोक त्याला “मौत का कुंआ” म्हणून संबोधतात. घाई घाईत रस्त्यावर चालताना रात्री अपरात्री जर समजा अचानक लाईट गेली तर किती मोठा अनर्थ होऊ शकतो याची कल्पना केल्या शिवाय राहणार नाही. या भूमिगत गटारीच्या चेंबरचे झाकण त्वरित बसवावे अशी मागणी होत आहे.
झोपेचे सोंग घेणाऱ्या संबंधित प्रशासनाने व संबंधित ठेकेदार यांनी वेळीच लक्ष दिले पाहिजे अन्यथा मोठी दुर्घटना झाली तर याला जबाबदार कोण?


