आपल खान्देशमहाराष्ट्र

कर्जत तहसिल कार्यालयात पाण्याचा खडखडाट, नागरिकांसह कर्मचा-यांची होतेय गैरसोय

  • प्रभाकर गंगावणे (रायगड जिल्हा प्रतिनिधी )

कर्जत: पाण्याशिवाय जीवन नाही. दैनंदिन जीवनात पाणी नसेल तर जीव सृष्टी नष्ट होईल हे त्रिकाल सत्य आहे. सद्या कोरोना महामारीचे भीषण संकट ओढावले आहे आणि त्यातच कर्जत तहसिल कार्यालयात मागील काही महिन्यांपासुन पाणी पुरवठा होत नसल्यामुळे तहसील कार्यालयातील कर्मचारी व कामानिमित्त येणा-या नागरिकांची गैरसोय होऊन कुचंबणा होत आहे. कर्जत तहसिल कार्यालयात पाण्याचा होणारा पुरवठा बंद असल्यामुळे नागरिकांना पिण्यास पाणी मिळत नाही तसेच शौचालयात व मुतारी मध्ये देखील पाणी नसल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. अत्यावश्यक सेवेकरिता पाणीच उपलब्ध नसल्यामुळे तहसील कार्यालयातील कर्मचारी व कामानिमित्त येणा-या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तहसिल कार्यालयातील पाणी पुरवठा बंद असल्याचे निदर्शनास आल्यानंतर माहिती अधिकार कार्यकर्ते प्रभाकर गंगावणे ह्यांनी नायब तहसिलदार श्री. एस. आर. बाचकर ह्यांना ह्याबाबत विचारणा केली असता त्यांनी तहसील कार्यालयाचा रस्ता बनवत असताना पाईप लाईन फुटली असुन लवकरच पाईप लाईन दुरुस्त करून पाणी पुरवठा सुरळीत करु असे उत्तर दिले. ह्यावर गंगावणे ह्यांनी नायब तहसिलदार श्री. बाचकर आण्णा ह्यांना कर्जत तहसिल कार्यालयात पाण्यावाचुन नागरिकांची व कर्मचा-यांची होणारी गैरसोय लवकरात लवकर दुर करावी अशी स्थानिक नागरिकांची विनंती आहे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे