आपल खान्देशमहाराष्ट्र
मुख्यमंत्रीच्या हस्ते जळगाव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत सन्मानित
झूम मराठी वृत्तसेवा
मुंबई (झूम मराठी) राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे हस्ते जिल्हाधिकारी जळगाव अभिजीत राऊत यांना सन्मानित करण्यात आले. मा. मंत्री महसूल श्री. बाळासाहेब थोरात, मा. मंत्री वस्त्रोद्योग श्री. अस्लम शेख व मा. मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांची याप्रसंगी उपस्थिती होती.
जळगाव जिल्ह्यातील 7/12 उताऱ्यावरील प्रलंबित कालबाह्य फेरफार नोंदी वगळण्याची धडक मोहिम राबवून अद्ययावत अभिलेख तयार करणे यात केलेल्या कार्याबद्दल हा सन्मान करण्यात आला. मोहिमेत सहभागी सर्व अधिकारी, कर्मचारी, शेतकरी यांचे अभिनंदन व धन्यवाद करत जिल्हाधिकारी जळगाव अभिजीत राऊत संवाद साधला.



