ब्रेकिंग

बाथरुमध्ये हिटरचा शॉक लागून मुलाचा मृत्यू, जळगाव तालुक्यातील धक्कादायक घटना

झूम मराठी

जळगाव : हिटरचा शॉक लागून अंघोळीसाठी बाथरुममध्ये गेलेल्या 13 वर्षाच्या मुलाचा मृत्यू  झाल्याची हृदयद्रावक घटना जळगावमध्ये घडली आहे. प्रणव मुकुंदा पाटील (13) असे दुर्दैवी मुलाचे नाव आहे. याबाबत जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अखस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुलाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे घरावर शोककळा पसरली आहे. प्रणवचे आई वडिल हे भावाच्या घरी गेले होते. प्रणव घरी एकटाच होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घरी प्रणवच्या मोठ्या भावाच्या लग्नाची तयारी सुरु आहे. याच लग्नासाठी आलेले पाटील यांचे नातेवाईक रविंद्र पाटील हे घरी आले असता त्यांच्या ही घटना कळली. त्यांनी लगेच सर्व नातेवाईकांना बोलावले.

जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथे मुकुंदा दामू पाटील हे आपली पत्नी आणि तीन मुलांसह राहतात. मुकुंदा पाटील यांचा मोठा भाऊ डिगंबर दामू पाटील यांच्या मुलीचा विवाह आहे. या विवाहाची जोरदार तयारी घरी सुरु आहे. यासाठीच मुकुंदा पाटील आणि त्यांची पत्नी दीपाली पाटील हे दोघे डिगंबर पाटील यांच्या घरी गेले होते. यावेळी प्रणव घरी एकटाच होता. दुपारच्या सुमारास प्रणव अंघोळीसाठी बाथरुममध्ये गेला होता. यावेळी बादलीत हिटर लावलेले होते. अचानक प्रणवला विद्युत हिटरचा धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाला.

पाटील यांच्या घरी लग्नासाठी आलेले रविंद्र पाटील हे घरी आले असता त्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तातडीने नातेवाईकांना बोलावून घेतले. मुलाचा मृत्यू झाल्याचे पाहून आईवडिलांनी हंबरडा फोडला. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे