घोसला ग्रामपंचायत कार्यालय येथे सोयगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी यांची ग्रामसभे मध्ये ग्रामपंचायतीला भेट.
सोयगाव (तालुका प्रतिनीधी)शासकीय नियमानुसार घालून दिलेल्या ग्रामसभा 16 नोव्हेंबर रोजी सर्व ग्रामपंचायतींवर ग्रामसभेचे नियोजन करण्यात आले होते.
मुख्यतः शासकीय नियमानुसार घालून दिलेल्या सर्व ग्रामपंचायतीमधील ग्रामसभेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार 100% लसीकरण व मतदान याद्यांचे वाचन हे विषय मुख्य स्वरूपात घेण्यात आले.
त्यातच प्रामुख्याने सोयगाव तालुका पंचायत समिती गट विकास अधिकारी यांनी तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींना भेट देऊन ग्रामसेवक व सरपंच यांना 100% लसीकरण व गाव खेड्यातील असणाऱ्या अडीअडचणी विषयी मुख्य असे मार्गदर्शन केले .
त्यातच घोसला ग्रामपंचायत येथे गटविकास अधिकारी यांनी भेट दिली असता गावातील सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने गावातील विकास व covid-19 या लाटेचा संभाव्य विचार करत त्या विषयीचे सखोल मार्गदर्शन घोसला वासियांना केले.
100% लसीकरण खूपच महत्त्वाचे असून त्या कारणाने सर्वांनी अगदी लसीकरण करून घेणे महत्त्वाचे आहे अशा शब्दात नागरिकांना पटवून दिले,. या सर्व विषयांवर माहिती दिली असता गावातील सर्व नागरिकांनी पंचायत समिती सोयगाव गट विकास अधिकारी यांचे विशेष आभार व्यक्त केले.
या ग्रामपंचायत ग्रामसभेसाठी शासकीय सर्व कर्मचारी सरपंच ,उपसरपंच ,सदस्य ,व समस्त गावकरी मंन्डळी घोसला मोठ्या संख्येने हजर होते.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा