आपल खान्देशगुन्हेगारी

पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे 55 वर्षीय व्यक्तीने बालिकेवर केला अतिप्रसंग! पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल

झूम मराठी

 

पाचोरा तालुक्यातील  नगरदेवळा येथे 55 वर्षाच्या  व्यक्तीने लहान बालिकेवर अत्याचार केल्याचा अतिशय घृणास्पद प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलीस स्थानकात पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या नराधमाला अटक करण्यात आली आहे.

पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील तीन वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील संशयित इसमाविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनला पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरदेवळा येथील पिडीत बालिकेच्या आईने या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. सुभाष महाजन वय वर्ष जवळपास 53 ते 55 असे संशयीत आरोपीचे नाव आहे.१२ एप्रिल २०२२ च्या सायंकाळी 6:30 वाजता फिर्यादीचा रमजान महिन्याचा रोजा उपवास असल्याने उपवास सोडण्यासाठी पीडित बालिकेस आवाज दिला असता मुलगी घरात दिसत नसल्यामुळे तिची आई तिचा शोध गल्लीत घेत होती. दरम्यान जवळच असणाऱ्या सुभाष महाजन याच्या घरातून बालिकेच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर हा प्रकार उघड झाला. संशयीत सुभाष महाजन हा त्याच्या घरात बालिकेवर अतिप्रसंग करत असल्याचे परिसरातील लोकांना आढळून आले. गल्लीतील लोकांनी सुभाष महाजन यास बेदम मारहाण केली होती. या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयितास ताब्यात घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

संशयिताचा बकऱ्यांचा व्यवसाय असून घरात पत्नी, चार मुली, दोन मुलींची लग्न झालेली तर दोन मुलींची लग्न बाकी असल्याची माहिती मिळतेय, जमावातर्फे सर्व घराच्या संसाराची तोडफोड करून घराचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलेले आहे, 

जमावातील काहींनी पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली असून एक पोलीस गंभीर जखमी असल्याचे कळत आहे, त्यांच्यावरही कार्यवाही करणार असल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनला भाग ५ गुरनं. १६२/२२ भादवी कलम ३५४अ सह पोस्को कायद्यानुसार रितसर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पी.आय किसनराव नजन पाटील यांच्या निगराणीत पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे करीत आहेत. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधीकारी भारत काकडे, पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, अशोक उतेकर, उपनिरीक्षक गणेश चौबे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. 

सर्वत्र शांततेचे आवाहन करण्यात आले असून आता सर्व परिस्थिती पोलीसांच्या नियंत्रणात आली आहे, पाचोरा, जळगांव येथील दंगा पथक सह भला मोठा फौज फाटा नगरदेवळा येथे तैनात करण्यात आला असल्याने बाजारपेठ देखील खुल्या करण्यात आलेल्या असून चोख पोलीस बंदोबस्त हजर आहे,

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे