आपल खान्देशमहाराष्ट्रराजकीय

पाचोरा येथे आज शासन आपल्या दारी’ उपक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित दादा यांच्या उपस्थिती लाभणार.


‘शासन आपल्या दारी’ उपक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित दादा यांच्या उपस्थिती लाभणार..

पाचोरा-भडगाव तालूकास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमासाठी मुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे यांचेसह या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत,पालकमंत्री गुलाबराव पाटील, ना.गिरीश महाजन, ना,. अनिल पाटील,ना.अब्दुल सत्तार, ना.दादा भुसे, ना.डॉ तानाजी सावंत यांच्यासह संपुर्ण मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री यांची उपस्थिती लाभणार आहे.शासनाच्या लोककल्याणकारी योजना व व्यक्तिगत लाभाच्या योजनांचा लाभ गरजू नागरिकांना मिळावा यासाठी राज्य शासनाच्या वतीने राज्यभर ‘शासन आपल्या दारी’ या महत्वाकांक्षी कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा निहाय सुरू आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणून तालुकास्तरीय’ शासन आपल्या दारी’हा उपक्रम घेण्याचे नियोजन करण्यात आले असून जळगाव जिल्ह्यातील पहिला तालुकास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम पाचोरा येथे होणार आहे. यासाठ मुख्यमंत्री यावेळी पाचोरा व भडगाव तालुक्यातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न सुरू असलेल्या नगरदेवळा येथील औद्योगिक वसाहत, पाचोरा येथील उपजिल्हा रुग्णालय, क्रीडा संकुल,ऑक्सिजन पार्क या सह विविध विकास कामांचे देखील भूमीपूजन व उद्घाटन केले जाणार आहेत. शिवाय पाचोरा व भडगाव तालुक्यातील सुमारे पंधरा हजार लाभार्थ्यांना विविध शासनाच्या योजनांचा लाभ देण्याचे नियोजन प्रशासन स्तरावर केले असुन याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह आ.किशोर अप्पा पाटील व प्रांताधिकारी भूषण अहिरे यांनी या पूर्वीच सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन नियोजन केले आहे.

नर्मदा ऍग्रोचे मुख्यमंत्री करणार उद्घाटन पाचोरा येथील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम आटोपल्यावर नांद्रा ता. पाचोरा येथील नर्मदा ऍग्रो या फॅक्टरीचे उद्घाटन मुख्यमंत्री यांचे हस्ते होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री व सर्व मंत्रीगण ,खासदार,आमदार व सर्व प्रमुख मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे