ग्रामीण पत्रकार संघ (म.रा) जळगाव जिल्हा अध्यक्षपदी सुरेश तांबे तर कार्याध्यक्षपदी कुंदन बेलदार यांची निवड
झूम मराठी
पाचोरा (प्रतिनिधी):- पारोळा येथील शासकीय विश्रामगृह येथे दिनांक 7 एप्रिल 2022 रोजी ग्रामीण पत्रकार संघ (म.रा) ची बैठक विभागीय अध्यक्ष मा. राजूभाई जावरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली असून या बैठकीत स्वर्गीय पी. एल. शिरसाट प्रणित ग्रामीण पत्रकार संघ (म.रा) जळगाव जिल्हा अध्यक्षपदी पाचोरा येथील रहिवासी आणि जळगाव तरुण भारत चे प्रतिनिधी सुरेश धनराज तांबे यांची श्रीमती चंदाताई पी. शिरसाठ राष्ट्रीय अध्यक्षा यांच्या आदेशानुसार विभागीय अध्यक्ष मा. राजूभाई जावरे यांनी केली असून तसे नियुक्ती पत्र देण्यात आले आहे तसेच सत्यकाम न्यूज चे कार्यकारी संपादक कुंदन बेलदार यांची जळगाव जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली असून नियुक्ती पत्र देण्यात आले ग्रामीण पत्रकार संघाच्या वाढीसाठी शुभेच्छा देण्यात आले आहेत यावेळी विभागीय सचिव भीमराव खैरे, अशोक कापडणे,मंगेश पाटील (उ. म.अध्यक्ष),फिरोज देशमुख पाचोरा तालुकाध्यक्ष, राकेश जावरे, दयाराम मोरे, आर. टी. सोनार, रमेश पवार, लक्ष्मण लोखंडे आदी पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. ग्रामीण पत्रकार संघ जळगाव जिल्हा अध्यक्षपदी सुरेश तांबे व कार्याध्यक्षपदी कुंदन बेलदार यांची निवड झाल्याने त्यांचेवर सर्व स्तरातून अभिनंदनपर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



