आपल खान्देशगुन्हेगारी

जळगाव शहरात 40 वर्षीय इसमाची चॉपरने वार करीत हत्या!

झूम मराठी

जळगाव : अनैतिक संबंधातून जळगावात अवघ्या आठ दिवसांपूर्वी दोन युवकांच्या हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच सोमवार, 4 रोजी सायंकाळी पुन्हा शहरातील शिवाजीनगर हुडको परीसरात 40 वर्षीय इसमाचा चॉपरचे वार करून खून करण्यात आल्याची घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. रात्री उशिरापर्यंत खुनाचे कारण कळू शकले नाही. मोहंमद मुसेफ शेख इसाक (40, रा. शिवाजी नगर) असे मयताचे नाव आहे.

चॉपरचे वार करीत हत्या

जळगावच्या शिवाजीनगर हुडको परीसरातील रहिवासी असलेल्या मोहंमद इसाकवर अज्ञातांनी सोमवरी सायंकाळच्या सुमारास चॉपरचे घाव घालून हल्ला केला. उपचारार्थ हलवल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हल्लेखोर पसार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. हा हल्ला नेमका कुणी केला याची माहिती समोर आली नसली तरी यामुळे परीसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, एलसीबी निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

नऊ दिवसात तिसरी खुनाची घटना

जळगावात 24 तासांच्या अंतरात दोन तरुणांच्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून 26 मार्च रोजी खून झाला होता. पहिल्या घटनेत समता नगर भागातील रहिवासी सागर नरेंद्र पवार (28) या तरुणाचा विवाहितेशी असलेल्या अनैतिक संबंधातून संशयीत आरोपी अमित नारायण खरे ( डॉ. आंबेडकर नगर, समता नगर, जळगाव) याने शुक्रवारी रात्री खून केला तर दुसऱ्या घटनेत जळगावच्या शिवाजी नगर भागातील पतीपासून विभक्त राहत असलेल्या महिलेशी असलेल्या दोघांच्या असलेल्या अनैतिक संबंधातून रीक्षा चालक असलेल्या नरेश आनंदा सोनवणे (28, रा. राजाराम नगर, दुध फेडरेशन) या तरुणाची चॉपरचे वार करून हत्या करण्यात आली. जळगावातील शिवाजी नगर, हुडको भागात शनिवार, 26 रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. या प्रकरणी आकाश सखाराम सोनवणे (24, कानळदा रोड, जळगाव) या आरोपीच्या जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. दरम्यान, शहरात दिवसागणिक गुन्हेगारी वाढत असून क्षुल्लक कारणावरून खुनाच्या घटना घडत असल्याने नागरीकांमध्ये घबराट पसरली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे