पाचोऱ्यात सतगुरु सेवालाल महाराज यांची 283 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी
वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटना पाचोरा व समस्त गोर बंजारा बांधव यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली
झूम मराठी
पाचोरा, (प्रतिनिधी) वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटना पाचोरा व समस्त गोर बंजारा बांधव यांच्या संयुक्त विद्यमाने रामदेव लॉन पाचोरा येथे सतगुरु सेवालाल महाराज यांची 283 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आदरणीय दादासो. मेहताबसिंग जी नाईक व प्रमुख अतिथी पाचोरा तालुका ग्रामीण हॉस्पिटल चे आदरणीय डॉ. रजेसिंग राठोड व आंबे वडगाव आश्रम शाळेचे चेअरमन आदरणीय अरुण जी पवार व.ना. अ.क. संघटनेचे जिल्हा प्रतिनिधी मा.श्री राजेंद्र का.राठोड पाचोरा तालुका अध्यक्ष मा.श्री संजू राठोड, मा.वासुदेव चव्हाण तालुका उपाध्यक्ष तसेच व.ना. अ. क.संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले विविध पदाधिकाऱ्यांचे मनोगत व्यक्त करण्यात आले समृद्धी राजेंद्र राठोड इयत्ता 4 थी मधील मुलीने गोर बंजारा भाषेत भाषण केले सर्व श्रोत्यांनी तिचे कौतुक केले शेवटी अध्यक्षीय भाषणा ने कार्यक्रमाची सांगता झाली व शेवटी संत सेवालाल महाराज यांना नैवद्य देऊन आरती करून कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाचे सूत्र संचलन वसंतराव नाईक कर्मचारी संघटनेचे जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र काशिनाथ राठोड केले.




