आपल खान्देशगुन्हेगारी

एरंडोल येथील सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या 37 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी, तीन आरोपीना अटक

झूम मराठी

एरंडोल येथील सेवानिवृत्त प्राध्यापक यांच्या 37 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी आनंदा रामदास चौधरी (एरंडोल), राजेंद्र अमृत धनगर( खडके बु,)उमेश श्रीराम पाटील(जवखेडेसिम) या तिघां आरोपीना धरणगाव न्यायालयात हजर केले असता त्यांना 4 दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली,

या अगोदर यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती, दरम्यानच या गुन्ह्याची व्याप्ती मोठया प्रमाणावर वाढत आहे, 84 लाख पर्यंत फसवणूक झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे, दरम्यान एरंडोल येथील बहुचर्चित राजकीय वलय प्राप्त असलेला स्टॅम्प वेन्डर याच्या कार्यालयातून व रजिस्टर ऑफीस मधून 6 गोण्या कागदपत्रे तपासा साठी जमा करण्यात आले आहे, दरम्यान ज्या वेन्डर ला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे त्याच्या नावावर लायसन नाही आहे,चोर सोडून संन्यासाला फाशी देण्याचा प्रकार आहे,लायसन धारी वेन्डर मोकाट फिरत आहे, सर्व सामान्य नागरिकांमध्ये मुख्य वेन्डर ला अटक व्हावी अशी चर्चा जोर धरत आहे,गेल्या 20 ते 22 वर्षांपासून हा बोगस वेन्डर त्याच्या पाहुण्याच्या लायसन रजिस्टर खरेदी विक्री चे व्यवहार करत आहे?या कडे रजिस्टर ऑफिस व तहसील प्रशासनाने सोयीस्कर अर्थपूर्ण दुर्लक्ष केले आहे,या मागील नेमके गौडबंगाल काय?.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे