भडगाव तालुक्यातील पिंपळगाव बांबरुडच्या शाळेतील माजी विध्यार्थ्याचे स्नेह मेळावा उत्साहात संपन्न
या शाळेतील माजी विद्यार्थ्यांचां मेळावा शाळेत नुकतेच आयोजित करण्यात आले होते
- दिलीप जय परदेशी
भडगाव तालुक्यातील पिंपळगाव बांबरुडच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दिवाळीत सुट्टीवर आलेल्या माजी विध्यार्थ्यांचे स्नेह मेळावा आयोजन करण्यात आले होते ह्या विद्यार्थ्यांनी आजवर शिक्षण घेतले व ते आज समाजात चांगल्या पदांवर कार्यरत आहेत या विद्यार्थ्यांनी स्नेह जपत स्नेह मेळावा मोठया उत्साहात झाला.
पिंपळगाव बांबरुडच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व सवंगडी पुन्हा भेटल्याचा आनंद या माजी विध्यार्थ्यांमध्ये दिसत होता. ही भेट व्हावी आणि सर्व मित्र आणि मैत्रिन एकाच दिवशी एकत्रित यावे यासाठी माजी विद्यार्थींपैकी काही विद्यार्थींनी घेतलेली मेहनत ख-या अर्थाने आनंद देऊन गेली.
दहावीच्या सन 2007 -2008 माजी विध्यार्थ्यांचे स्नेह मेळावा कार्यक्रम 05 नोव्हेंबर मंगळवारी झाला यावेळी शिक्षक हि उपस्थित होते जुन्या आठवणींना उजाळा देत हा संमेलन झाले, माजी विध्यार्थी शितल गुलाब देवरे हिने प्रोजेक्टर शाळेला भेट दिल्याने सर्व उपस्थित शाळेतील शिक्षकांनी तिचे कौतुक केले.

तसेच दहावीच्या सन 2008 -2009 च्या माजी विध्यार्थ्यांचे 04 नोव्हेंबर सोमवारी रोजी स्नेह संमेलन शाळेतील स्टाफच्या उपस्थितीत सर्व विद्यार्थी व विध्यार्थीनी पुन्हा एकदा धमाल केली एकमेकांनी आपला परिचय देऊन हा कार्यक्रम संपन्न झाला या बॅचचा माजी विध्यार्थी विशाल रमेश पाटील याने शाळेला भेट म्हणून कॅनन झेरॉक्स प्रिंटर दिले व चेतन भिला पाटील या विध्यार्थ्याने डेल कंपनीचे लॅपटॉप दिले तसेच भगवान धरमसिंग राजपूत याने आपल्या बॅचच्या उपस्थित सर्व विध्यार्थीनींना भाऊबीज निमित्त पैठणी भेट दिल्या.
दिनांक 03 नोव्हेंबर रविवारी दहावीच्या सन 2010 -2011 माजी विध्यार्थ्यांचे संमेलन झाले, यावेळी एकमेकांना भेटून या माजी विद्यार्थ्यांनी अनेक गोष्टींवर एकमेकांशी चर्चा केली.

या विद्यार्थ्यांचे स्नेहमेळावा शाळेत नुकतेच आयोजित करण्यात आले होते. यावेळी एकमेकांना भेटून या माजी विद्यार्थ्यांनी अनेक गोष्टींवर एकमेकांशी चर्चा केली. अनेक वर्षांनंतर एकमेकांना भेटलेल्या माजी दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी झालेल्या वाटचालीची एकमेकांना माहिती दिली.
यावेळी शाळेतील मुख्याध्यापक बि जी पाटील, पर्यवेक्षक एस पि पाटील, ए आर पाटील, आर एम पाटील, के एच पाटील, वाय एस पाटील, व्ही ए पाटील, एस डी पाटील, एस व्ही पाटील, देशमुख सर, चव्हाण सर, मांडोळे सर व शाळेतील कर्मचारी उपस्थित होते.




