आपल खान्देशगुन्हेगारी

शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना ; शिकवणीसाठी आलेल्या 2 अल्पवयीन मुलीवर शिक्षकाने केले अत्याचार

भुसावळ (वृत्तसेवा) राज्यात अनेक दिवसांपासून राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली आहे. सामूहिक बलात्कार अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार अशा घटनांनी महाराष्ट्राची प्रतिमा काळवंडली आहे. देशातील विविध कोपऱ्यातून दररोज हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. यातच महाराष्ट्राच्या जळगाव जिल्हातून भुसावळमध्ये शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका सेवानिवृत्त शिक्षकाने दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची संताजपजनक घटना घडली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, भुसावळ शहरात एक सेवा निवृत्त शिक्षक हा खासगी शिकवणी वर्ग घेत होता. याच शिक्षकाकडे दोन अल्पवयीन मुली नियमितपणे त्याच्याकडे शिकवणीसाठी जात होत्या. मात्र या शिक्षकाने या अल्पवयीन मुलींचा गैरफायदा घेत त्यांच्यावर अत्याचार केले. आणि तसच घडलेला प्रकार घरी न सांगण्याची धमकी देखील त्यांनी दिली. मात्र या घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती आपल्या घरी या दोन्ही अल्पवयीन मुलींनी सांगितली. हा प्रकार ऐकताच पीडितेच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आणि त्यांनी पोलीस स्थानकात धाव घेत त्यांनी नराधम शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली.

सदर तक्रारीची पोलिसांनी दखल घेऊन नराधम शिक्षकाला अटक केली. तसेच या नराधम शिक्षकाविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत केला गुन्हा दाखल केला आहे. तो याआधीही इतर ठिकाणी शिकवण्यासाठी होता. त्या ठिकाणीही त्याने असे प्रकार केले का ? याचा पुढील तपास भुसावळ पोलीस करत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे