आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

राष्ट्रीय महिला दिनानिमित्त गो.से.हायस्कूलमध्ये विद्यार्थिनींच्या विविध स्पर्धा संपन्न


झूम मराठी वृत्तसेवा

पाचोरा ( प्रतिनिधी) पी टी सी संचलित श्री गो से हायस्कूल पाचोरा येथे आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विद्यालयात विद्यार्थिनींसाठी संगीत खुर्ची, धावणे, बुद्धिमत्ता ,लिंबू चमचा ,निबंध स्पर्धा गायन स्पर्धा , स्मरणशक्ती स्पर्धा,अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

यावेळी विद्यार्थिनींमध्ये नवचैतन्य व उत्साह दिसून आला गेल्या दोन वर्षापासून मैदानी स्पर्धा, शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम कोरोनामुळे बंद असल्यामुळे केवळ घरातच राहून ऑनलाईन क्लास क्लास देऊन विद्यार्थी वैतागले होते परंतु यावेळी कोरणाचे सावट नसल्याने शाळा सुरू झाले आहेत त्यामुळे विद्यार्थी आनंदाने या स्पर्धेत सहभाग घेतला शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धेचे आयोजन केल्याने पालकांमध्ये समाधान दिसून आले विद्यार्थी आनंदाने भारावले. या स्पर्धेचे उद्घघाटन शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ अंजली गोहिल यांनी केले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी शाळेतील मुख्याध्यापक .सुधीर पाटील ,उपमुख्याध्यापिका सौ.वाघ मॅडम पर्यवेक्षक .एन. आर. पाटील सर तसेच शाळेतील सर्व शिक्षक -शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे