महाराष्ट्रराजकीय
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत आगामी निवडणुकांसंदर्भात महत्वपूर्ण निर्णय!
एस. म्हात्रे
गरज असेल तिथेच आघाडी, राष्ट्रवादीचा मोठा निर्णय
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षातील मंत्र्यांची बैठक काल सह्याद्री अतिथिगृहावर पार पडली. यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिवसेना-काँग्रेससोबत आघाडी करण्यासंबंधी चर्चा झाल्याचे वृत्त आहे. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, आदी मंत्र्यांची उपस्थिती होती. सोबतच राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात या बैठकीत घेण्यात आला आहे.

राज्यात मुंबईसह २३ महानगरपालिका, नगरपालिका, २५ जिल्हा परिषदा, पंचायत समित्या यांच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी कुणाशी आघाडी करायची आणि कुठे स्वबळावर लढायचं याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.




