ब्रेकिंग
उद्या पाचोऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य नोंदणी अभियानाचे आयोजन
झूम मराठी
पाचोरा (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रमुख शरदचंद्र पवार यांचे विचार घराघरात पोहचून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रसार व विस्तार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ अध्यक्षते खाली व नगरसेवक संजय वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या पाचोऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले आहॆ अशी माहिती विकास पाटील यांनी दिली.
पाचोरा राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रमाचे आयोजन उद्या पाचोऱ्यात सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आले आहे. या सदस्य नोंदणी अभियानात सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.





