आखतवाड्यात केशाआई माता यात्रा उत्सवात, लागली भव्य कुस्ती दंगल..!
स्पर्धेत भाग घेण्यासाठी परिसरातील शेकडो कुस्तीपटूंनी उत्साहाने सहभाग नोंदवला कुस्तीची एक समृद्ध परंपरा आहे.

संजय परदेशी @ प्रतिनिधी
पाचोरा तालुक्यातील आखातवाडे गावात केशाआई माता यात्रे निमित्त पारंपरिक कलेला प्रोत्साहन देण्यासाठी भव्य कुस्ती स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धांनी गावाच्या सांस्कृतिक आणि क्रीडा परंपरेला उजाळा दिला असून कुस्तीप्रेमी युवकांच्या उत्साहाला नवीन उमेद मिळाली आहे.
कुस्ती स्पर्धेचे आयोजन गावातील ग्रामस्थ, तरुण मंडळी आणि केशाआई माता यात्रोत्सव समितीच्या वतीने करण्यात आली. स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट कुस्ती खेळाला प्रोत्साहन देणे आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देणे हा होता. स्पर्धेत भाग घेण्यासाठी परिसरातील शेकडो कुस्तीपटूंनी उत्साहाने सहभाग नोंदवला कुस्तीची एक समृद्ध परंपरा आहे.
या गावाने अनेक गुणी पैलवान घडवले असून अशा या पारंपरिक वारशाचे जतन करण्यासाठी आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळावी यासाठीच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये स्थानिक तसेच आसपासच्या गावांतील नामवंत कुस्तीपटूंनी आपले कुस्ती कौशल्य सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब (जिभू) पाटील यांनी उपस्थित राहून कुस्त्यांची जोड लावत कुस्तीपटूंना प्रोत्साहन दिले. ग्रामीण क्रीडा संस्कृती जपण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
याप्रसंगी पाचोरा शहरातील माजी नगरसेवक शितल सोमवंशी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मंडळी, परिसरातील नागरिक तसेच कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेच्या शेवटी विजयी कुस्तीपटूंना रोख रक्कम देण्यात आली .ही कुस्ती स्पर्धा फक्त एक खेळाचे मैदान नव्हते, तर गावाच्या एकतेचे, सांस्कृतिक समृद्धीचे व तरुणाईच्या स्फूर्तीचे प्रतीक ठरले. यामुळे यात्रा अधिक संस्मरणीय झाली.



