पाचोरा नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभार बाबत उद्या मनसेचे उपोषण
५ आक्टोंबरपासून मनसेचे प्रशांत पाटील व त्र्यंबक नगर भागातील नागरिक नगरपालिकेसमोर आमरण उपोषणाला बसणार आहे.
झूम मराठी पाचोरा – पाचोरा नगरपरिषदच्या मुख्याधिकारी यांना वारंवार तक्रार अर्ज देवून सुद्धा प्रभाग क्रमांक ३ त्र्यंबक नगर मधील गटारीची कामे झाली नाहीत त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. गेल्या चार महिन्यापूर्वी एका गटारीचे काम करण्यात आले होते. पहिल्याच पावसात पूर्ण गटार जमीनदोस्त झाली आहे. निकृष्ट दर्जाचे झालेले काम याकडे प्रशासन जाणिवपुर्वक दुर्लक्ष करित आहे. प्रशासनाने झालेल्या निकृष्ठ गटाच्या कामाची चौकशी करावी सोबतच नवीन गटारी आणि रस्त्यांच्या कामाकडे लक्ष द्यावे, यासाठी मनसेच प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाच दि. ५ रोजी उपोषण करण्यात येणार आहे.
गेली वीस वर्षे झाले त्र्यंबक नगर मधील काही रहिवासी नगरपालिकेचा कर हा वेळेवर भरतात. आज कराची रक्कम वीस वर्षांमध्ये एवढी झाली आहे की या भागातिल रहिवाशी स्वखर्चातून मुलभुत गरज जसे गटारी व रस्ते हे नक्कीच करु शकले असते पण गेल्या वीस वर्षांमध्ये यंबक नगर मध्ये ना रस्ता झाला ना गटारी झाल्या. भुयारी गटारी आहे ते रस्ते सुद्धा खोदून ठेवले आहे त्यात या भागातिल काही दिवसांपीर्वी बनविण्यात आलेली गटार पावसाच्या पाण्यात वाहुन गेली. यासंदर्भात नगरपालिकेला १५ सप्टेंबर रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता. नगरपालिकेकडून व बांधकाम विभागाकडून या अर्जाची कोणत्याही प्रकारे दखल घेतली नाही.
त्यासाठी नगरपालिकेला प्रशांत पाटील यांनी दोन स्मरण पत्र दिले. तरीसुद्धा नगरपालिका मुख्याधिकारी व बांधकाम विभाग यांच्याकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही. तक्रार आणि स्मरणपत्र देउनही जनसामान्यांच्या मुलभूत गरजा पुर्ण करण्यासाठी प्रशासनाला जाग येत नसल्याने दि. ५ आक्टोंबरपासून प्रशांत पाटील व त्र्यंबक नगर भागातील नागरिक नगरपालिकेसमोर आमरण उपोषणाला बसणार आहे.


