ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकीय
नवाब मलिक यांना 14 दिवसांची कोठडी देण्याची ईडीची मागणी
मुंबई: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना आठ तासांच्या ईडी चौकशीनंतर अटक करण्यात आली आहे. सकाळी सात वाजल्यामुळे मलिकांची ईडीकडून चौकशी सुरू होती.
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवाब मलिक चौकशीत अधिकाऱ्यांना सहकार्य करत नव्हते, त्यामुळेच त्यांना अटक करण्यात आली आहे. मलिकांना अटक केल्यानंतर ईडीच्या पथकाने त्यांना रुग्णालयात नेले आहे, जिथे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आता त्यांना विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन जात आहे.
मलिक यांचे वकिल अमित देसाई यांचा बचावाचा युक्तिवाद
प्रिव्हेश्नव ऑफ मनी लॉडरिंग हा कठोर कायदा आहे. हा कायदा येण्यापूर्वी सहा वर्षे आधी 1996 मध्ये झालेल्या पॉवर ऑफ अॅटर्नीचा उल्लेख केला जात आहे. फौजदारी कायद्यात पूर्वलक्ष्यी प्रभावाने कारवाई करता येत नाही. तुम्ही वीस वर्षांनी जागे व्हाल आणि 14 दिवसांची पोलिस कोठडी मागाल हे बरोबर नाही.
या प्रकरणात गॅंगस्टर दाऊतविरोधात FIR कोणी पाहिलेला नाही. मलिक यांची दाऊद इब्राहीमशी लिंक असल्याच्या आरोपात तथ्य नाही. महाविकास आघाडीचा नेता राष्ट्रविरोधी कारवायांत सहभागी असल्याचे दाखवून द्यायचे आहे. त्यासाठी हा सारा खटाटोप सुरू आहे



