महाराष्ट्रराजकीय

ज्यांना नीट वाचता येत नाही त्यांनी सल्ले देऊ नये’,पाडळकरांची रोहित पवारांवर टीका

मुंबई | राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजप आमदार गोपीचंद पाडळकरांवर टीका केली आहे. ज्यांना नीट वाचता येत नाही, त्यांनी केंद्राला सल्ले देण्याचा उद्योग बंद करावा, असा हल्लाबोल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर केला आहे.MPSC परीक्षा आणि रखडलेल्या नियुक्त्यांवरुन पडळकरींनी रोहित पवारांवर टीकास्त्र सोडलं होतं.

काय म्हणाले पडळकर?

नियुक्त्यांबाबत घोषणा करुन ३० दिवस उलटले. रोहित पवारांनी सांगितलं होतं, पण आता ३१ तारीख उलटून गेली. लबाडी करण्यात हे माहीर आहेत, पण आता ते स्वत:च यावर वारंवार शिक्कामोर्तब करत आहेत, असा हल्लाबोल पडळकरांनी केला आहे.

या नियुक्त्या तीस दिवस उलटले तरी झालेल्या नाहीत, आपल्या घरगुती वादात इतर पाल्यांचे भविष्य अंधारात लोटू नका, प्रशासनात आपल्या कुटुंबाची किती वचक आहे,असे तुणतुणे वाजवण्यात तुमचे आयुष्य गेले आहे. या तुणतुणे वाजवण्याच्या नादात दुसऱ्यांचे नुकसान करू नका. एमपीएससी परीक्षा कधी घेणार, उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्ती कधी देणार, याचा ताळमेळ नाही, असं पडळकर म्हणाले आहेत.

तसेच एमपीएससी आयोगाच्या सदस्य नेमणुकीच्या बाबतीत राज्यपालांना ३१ जुलैआधी याद्या पाठवल्याचं आमदार रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे. मात्र आजच राज्यपाल भवनमधून २ ऑगस्ट रोजी याद्या आल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे हे सर्व किती लबाडी करतात यावर शिक्कामोर्तब केले आहे, असं टीकास्त्र पडळकरांनी सोडलं आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे