आपल खान्देश

सोयगावं तालुका परिसरातुन गाय चोरीस गेली, सहा दिवसाचे वासरू आईपासून पोरके.

पोलिसांनी मात्र रात्रीची गस्त वाढविली असल्याच्या विधानाला दुजोरा दिला आहे मात्र चोऱ्यांचे सत्र काही थांबत नसल्याने पशुपाल्कांची चिंता वाढली आहे.


घोसला (प्रतिनिधी) सोयगावसह परिसरात जनावरांच्या चोरीच्य घटना वाढल्या असतांनाच कवली आणि उमरविहीरे येथून अज्ञात चोरट्यांनी तीन गायी चोरून फरारी केल्याची घटना उघडकीस आलेली असून यामुळे पशुधनपालक चिंतेत आहे.पोलिसांनी मात्र सोयगाव परिसरात रात्रीची गस्त वाढवूनही चोऱ्यांच्या घटनेत वाढ होत असल्याने पोलिसांनाही प्रश्न पडला आहे

कवली ता.सोयगाव येथून गोठ्यात सहा दिवसाच्या वासरासह बांधलेल्या गायीला अज्ञात चोरट्यांनी चोरी करून पळविले असून या सहा दिवसाच्या वासराचा आईचा पान्हा दूर झाल्याने हे वासरू आईपासून पोरके झाल्याची हृदयद्रावक घटना या चोरीतून निष्पन्न झाली आहे.या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे मात्र पोलिसांकडून सोयगाव परिसरात रात्रीची गस्त वाढविल्याच्या घटनेला दोजोरा दिल्या जात असतांना मात्र चोऱ्या कशा होतात असाही प्रश्न पशुपालकांना पडला आहे.सोयगाव परिसरात जनावरांच्या चोरीत वाढ झालेली आहे.अन्जोळा शिवारात नुकत्याच मेंढ्या चोरीला गेली असल्याच्या घटने नंतर पुन्हा कवली आणि उमरविहीरे भागात तीन गायींची चोरी झाल्याचे निष्पन्न झाले असून पशुपालकांनी मात्र पोलिसांच्या चौकशीला सामोरे जाण्यासाठी होणारा नाहक मनस्ताप दूर करण्यासाठी पोलिसात तक्रारी दिल्या नसल्याचे बोलले जात आहे.कवली ता.सोयगाव येथून दावणीला बांधलेली दोन गायी आणि उमरविहीरे येथील एक गाय अशा दोन गायी चोरी झाल्या आहे.पोलिसांनी मात्र रात्रीची गस्त वाढविली असल्याच्या विधानाला दुजोरा दिला आहे मात्र चोऱ्यांचे सत्र काही थांबत नसल्याने पशुपाल्कांची चिंता वाढली आहे.

याबाबत सोयगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांनी रात्रीची गस्त वाढविली असून शुक्रवारी सायंकाळपासून सोयगाव पोलीस रस्त्यावर आढळून आले होते मात्र चोरटे पोलिसांच्या एक पावूल पुढे असून पोलिसांच्या वाहनाच्या आणि अपूर्ण मनुष्यबळाचा फायदा उचलून पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून जनावरांवर डल्ला मारत असल्याचा प्रकार करत आहे.यामुळे पोलिसांनाही रस्त्यासह अपूर्ण मनुष्यबळ आणि वाहना अभावी अडचणी येत असल्याचे बोलले जात आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे