गुन्हेगारी

धुळ्यात पन्नास हजरांची लाच घेतांना गुरुजी अडकले जाळ्यात

पीएचडीसाठी गुरुजींनी मार्गदर्शकाला लाच देण्याचा प्रयत्न केल्याने एसीबीने लाच देणाऱ्या गुरुजींच्या मुसक्या आवळल्या

झूम मराठी वृत्त

धुळे : लाच देणे आणि घेणे हा गुन्हा असला तरी लाच घेतानाच कारवाई झाल्याचे उदाहरण दिसून येते. धुळ्यात मात्र पीएचडीसाठी गुरुजींनी मार्गदर्शकाला लाच देण्याचा प्रयत्न केल्याने एसीबीने लाच देणाऱ्या गुरुजींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

बहिणाबाई उत्तर महाराष्ट विद्यापीठाचे एमफील पीएचडीचे मार्गदर्शक असलेल्या एका गुरुंजींच्या मार्गदर्शनाखाली तीन संशोधक विद्यार्थ्यांचे संशोधनाचे कार्य सुरु आहे. त्यापैकी एक विद्यार्थी हा बसरावल (ता.साक्री) येथील जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक सुकेंद्र किसनराव वळवी हे कार्यरत आहेत. त्याने २०१५ मध्ये पीएचडीसाठी विद्यापीठात नोंदणी केली होती. विद्यापीठाच्या नियमानुसार आणि संशोधन पध्दतीनुसार अभ्यास करुन शोध प्रबंधाचे लेखन करुन सामाई प्रगती अहवाल मार्गदर्शक गुरुंच्या सहिने सादर करायचा असतो. मार्गदर्शक असलेल्या या तक्रारदार गुरुंनी शोध प्रबंधाची तपासणी करुन त्यामध्ये काही त्रुटी दर्शवून महत्वाच्या काही सुचना दिल्या होत्या परंतु सुकेंद्र वळवी यांनी तक्रारदाराला पीएचडीचे संशोधन प्रबंधाचे सहामाई प्रगती अहवाल

मार्गदर्शन म्हणून प्रमाणित करुन विद्यापीठा सादर करण्यास परवानगी द्यावी. तसेच लवकर पीएचडीची पदवी मिळावी, यासाठी मार्गदर्शक गुरुंची इच्छा नसतांना वेळोवेळी पैशांचे आमिष दाखविले त्यामुळे मार्गदर्शक गुरुंनी बळजबरीने लाच दिली जात असल्याबाबत धुळे एसीबीकडे तक्रार केली. तक्रारीची शहनिशा करत बुधवार, २ रोजी एसीबीने देवपुरातील नगावबारी चौफुली येथील हॉटेल बालाजी येथे सापळा लावला. तेव्हा सुकेंद्र वळवी हा तक्रारदार गुरुंना त्यांच्या इच्छेविरूध्द ५० हजारांची लाच देत असतानाच त्यास पथकाने रंगेहात पकडले.

सापळा एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर, पोलिस निरीक्षक मंजीतसिंग चव्हाण, प्रकाश झोडगे तसेच शरद काटके, राजेन कदम, कृष्णकांत वाडीले, कैलास जोहरे, प्रशांत चौधरी, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, महेश मोरे, गायत्री पाटील, संतोष पावरा, संदीप कदम, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांच्या पथकाने यशस्वी केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे