रोहिले बुद्रुक प्राथमिक शाळेत शालेय व्यवस्थापन समितीची बैठक संपन्न, शिक्षक शिवानंद हरिभाऊ सूर्यवंशी यांचा ठरावास विरोध
नांदगाव (प्रतिनिधी) मुक्ताराम बागुल – नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील पासून अवघे चार ते पाच किलोमीटर अंतरावरील मौजे रोहिले बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत आज दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी सकाळी ठिक अकरा वाजता शालेय व्यवस्थापन समितीची बैठक संपन्न झाली.
या बैठकीत शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांची निवड करणे बाबत, शाळेला तार कंपाउंड करणे बाबत, शासनाने दिलेल्या अनुदाना मधून विद्यार्थ्यांना घेतलेल्या गणवेश वाटप करणेबाबत आदी विषयावर चर्चा करण्यात आली. पैकी शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात यावा असा ठराव मंजूर करण्यात आला. यास कोणीही विरोध केला नाही. शाळेच्या आवाराला तार कंपाउंड व गेट करण्यात यावा यावर चर्चा करण्यात आली यावेळी शाळेला एकच गेट करण्यात यावा व तार कंपाउंड करण्यात यावी. तसेच जो व्यक्ती शाळेला गेट बांधून देईल कॉलमध्ये त्याचे नाव प्रवेश द्वार असे नाव देण्यास हरकत नाही परंतु त्या गेट चा संपूर्ण खर्च त्या वर्गणी दाराने व्यक्तीने स्वतः करावा लागेल. आणि जे दानशूर व्यक्ती कमीत कमी अकरा हजार रुपयांच्या वर वर्गणी देतील त्यांची नावे तार कंपाउंड ला छोटी पाटी तयार करून त्यावर त्याचे नाव लिहून वेल्डिंग करून देण्यात यावी व शाळेतील मुख्याध्यापकांच्या रूममध्ये नावाचा फलक लावण्यात यावा असा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांची निवड करणेबाबत यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेत शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी आज पर्यंत आपल्या गावातील वडार समाजातील विद्यार्थ्यांच्या पालकांना शालेय व्यवस्थापन समितीच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी वडार समाचार डावलण्यात आले असून सर्व समाजातील विद्यार्थ्यांच्या पालकांना अध्यक्षपद देण्यात आले आहे त्यामुळे वडार समाजाच्या विद्यार्थ्यांच्या पालकांवर अन्याय न करता वडार समाजातील विद्यार्थ्यांच्या पालकांना अध्यक्षपदी निवड करण्यात यावी अशी सूचना ग्रामपंचायत उपसरपंच शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सौ सुनंदा बागुल यांनी मांडली यावर सौ सुनिता भिमराज बागुल यांनी अनुमोदन दिले तर किशोर कारभारी पवार, भारती अण्णासाहेब बागुल, अमोल रामदास पवार आदींनी ठरावास मंजुरी दिली. परंतु प्राथमिक शाळेचे शिक्षक शालेय व्यवस्थापन समितीचे सचिव हरिभाऊ सूर्यवंशी यांनी यास दुजोरा दिला आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सौ कल्पना अनिल आरबुज याच राहतील असे सांगितले. यावर सुनील बागुल यांनी म्हटले की तुम्ही तुमच्या मनाने राजकारण करून कल्पना अनिल आरबुज यांची अध्यक्षपदी निवड केली ही कशी साजरी केली आणि जर तुम्हाला कल्पना अनिल आरबुज ह्याच पाहिजे होत्या तर आजच्या मिटिंग मध्ये हा विषय घेतलास कशाला असा टोला शिवानंद सूर्यवंशी यांना केला. तरी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची निवड ही बेकायदेशीर असून ती निवड लोकशाही पद्धतीने करण्यात यावी अन्यथा शासन दरबारी आपल्या विरोधात तक्रार करावा लागेल असे रोहिले बुद्रुक येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या बैठकीमध्ये ठणकावले त्यामुळे प्राथमिक शाळेचे व्यवस्थापन समितीचे शिवानंद हरिभाऊ सूर्यवंशी यांना गावातील प्रतिष्ठित व काही कर्मचारी यांच्यामुळे बदनाम होण्याची वेळ आली आहे
तरी रोहिले बुद्रुक प्राथमिक शाळेचे शिक्षक शिवानंद हरिभाऊ सूर्यवंशी यांनी निपक्षपाती लोकशाही पद्धतीने शालेय व्यवस्थापन समिती गठित करावी अशी मागणी सौ सुनंदा मुक्ताराम बागूल व शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी केली आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा