आपल खान्देशगुन्हेगारीब्रेकिंग

पाचोरा शहरात तरुणाचा चाकूने भोसकून खून! पाच संशयित ताब्यात

दुचाकीचा कट लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून पाचोऱ्यात तरुणाचा खून ; पाच संशयित ताब्यात

पाचोरा (वार्ताहर) दि३१पाचोरा शहरातील गुन्हेगारीने तोंड वर काढले असून शहरातील पुनगाव रोड स्थित बुऱ्हाणी शाळे समोरील मोकळ्या जागेत रविवारी संध्याकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास तरुणांच्या दोन गटात दुचाकीचा कट लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून लाठ्या काठ्या, चॉपर, फायटरचा वापर करत तुंबळ हाणामारी झाली यात शहरातील पुनगाव रोड लगत असलेल्या दुर्गा नगर भागातील २३ वर्षीय युवक भूषण नाना शेवरे याचा खून झाला असून सनी रवींद्र देवकर वय २३ रा.गाडगेबाबा नगर याचे फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात सकाळी ३ वाजता खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तात्काळ पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान अनेक वर्षांनंतर पाचोऱ्यात खुनाचा गुन्हा घडल्याने खळबळ उडाली असून शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुंडगिरीला चाप लावण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.

या प्रकरणी आठ पेक्षा जास्त युवकांना ताब्यात घेतले आहे. फॉरेसिंस लॅब चे पथक रात्रीच दाखल झाले आहेत पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील सह पथकाने जोरदार तपास चक्रे सुरू केले. आरोपी सुटायला नको हवे यासाठी पोलीस बारीक तपास करीत आहेत. मयत जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.खुनात नवीनच युवकांचा समावेश असल्याने पोलीस देखील चक्रावले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे