लोहारा येथील डॉ. जे जी पंडित विद्यालयात महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्ताने कार्यक्रम संपन्न
झूम मराठी वृत्त
लोहारा (प्रतिनिधी) पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील द शेंदुर्णी सेंक एज्यु कोऑप सो द्वारा संचालित डॉ.जे.जी पंडीत माध्यमिक विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी निमित्ताने कार्यक्रम संपन्न झाला.

महात्मा गांधीजींचे अहिंसा व स्वच्छता या तत्वानुसार ग्राम स्वच्छता अंतर्गत गावातील बसस्टँड परिसर विद्यार्थ्यांनी हातात खराटा घेऊन स्वच्छ व साफ करून गांधींजींचे साफ सफाईचे तत्व जीवनात अंगिकारले नंतर वकृत्व स्पर्धा घेण्यात आली त्यात विद्यार्थ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवन चरित्रावर आपले मनोगत व्यक्त केले विद्यालयातील विद्यार्थी यश चंद्रकांत पाटील याने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची वेशभूषा परिधान करून महात्मा गांधी यांचे विचार मांडले विद्यालयाचे उपशिक्षक व गायक श्री पी यु खरे सरांनी आपल्या मधुर वाणीने गांधीजींचे भजन गाऊन सारा परिसर मंत्रमुग्ध करून दिला कार्यक्रमाचे अध्यक्ष व्ही एम शिरपूरे सर यांनी महात्मा गांधीजींचे विचार सत्य अहिंसा किती महत्त्वाचे आहे हे आपल्या भाषणातून सांगितले विद्यालयात राबविण्यातआलेल्या या विविध उपक्रमांना विद्यालयातील वरिष्ठ शिक्षक डी एम गरुड पी एम सुर्वे एन व्ही बोरसे के एम पाटील भिल्ल सर वाय व्ही चौधरी पी एम पाटील वाय पी वानखेडे एस बी सावकारे यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर के सुरवाडे यांनी केले व आभार पी एम सुर्वे यांनी मानले या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते व त्यांच्या अनमोल सहकार्याने कार्यक्रम यशस्वी पार पडला यावेळी कोविड 19 या शासन नियमाचे तंतोतंत पालन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे जेष्ठ विज्ञान शिक्षक श्री व्ही एम शिरपूरे होते राष्ट्रपिता महात्मा गांधी कै आचार्य बापूसाहेब गरुड यांच्या प्रतिमांचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष व विद्यालयाचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री आर एस परदेशी पर्यवेक्षिका सौ यु डी शेळके जेष्ठ शिक्षक श्री डी एम गरुड श्री पी एम सुर्वे श्री एस एस गुजर श्री आर जी बैरागी श्री आर के सुरवाडे श्री पी यु खरे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी गावातील जेष्ठ पत्रकार कृष्णा अप्पा शेळके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.



