ब्रेकिंग

नंदुरबार-निझर रस्त्यावर ४५ लाखांचा गुुटखा जप्त!

नंदुरबार = निझर-नंदुरबार रस्त्यावर धमडाई फाटयाजवळ विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या विशेष पथक व स्थानिक गुन्हे शाखेने अवैध गुटखा वाहतुकीवर कारवाई करुन ४५ लाख २० हजार रुपये किंमतीचा विमल गुटखा मुद्देमालासह जप्त केला आहे. याबाबत ४ जणांना अटक  करण्यात आली आहे.

दरम्यान, नाशिकच्या पथकाला नंदुरबारातून होणार्‍या गुटखा तस्करीची माहिती मिळते मग नंदुरबारची यंत्रणा काय करते? ही कारवाई धुळे जिल्हयातील चौघांवर करण्यात आली आहे तर नंदुरबारचा वाहनचालक वाहन सोडून फरार दाखवण्यात आला आहे. याबाबतचे गौडबंगाल काय? असे प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.

नंदुरबार जिल्ह्यात महाराष्ट्रात बंदी असलेला विमल गुटखा तंबाखुची होणारी अवैध चोरटी विक्री व वाहतुकीचे प्रमाण लक्षात घेता विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी. शेखर पाटील यांना दि.२७ जानेवारी रोजी सकाळी गुजरात राज्यातील निझर येथून नंदुरबारमार्गे दोन पिकअप वाहनांमध्ये विमल गुटख्याची वाहतूक होणार आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाली होती.

त्यानुसार डॉ.बी.जी. शेखर पाटील यांनी तात्काळ आपल्या विशेष पोलीस पथकाला माहिती देवून कारवाई करण्याचे आदेश दिले. विशेष पोलीस पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक बापू रोहम यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मदतीने अत्यंत गोपनीयता पाळत दि.२६ जानेवारी रोजी रात्री नंदुरबार येथे निझर-नंदुरबार मार्गावर धमडाई फाटयाजवळील सृष्टी हॉटेलसमोर सापळा रचला.

गुजरात राज्यातील निझर येथून नंदुरबारकडे दिशेने येणार्‍या वाहनांची तपासणी करीत असतांना दि.२७ जानेवारी रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास गुजरात राज्यातील निझरकडून नंदुरबारच्या दिशेने दोन पिकअप वाहन वेगाने येतांना दिसून आले.

विशेष पथकातील अंमलदारांनी त्यांना हातातील बॅटरीच्या सहाय्याने वाहन उभे करण्याचा इशारा दिला. परंतु वाहन चालकाने वाहन न थांबविता भरधाव वेगाने निघुन गेला. पोलीसांनी दोन्ही वाहनांचा पाठलाग करुन शिताफीने दोन्ही वाहनांना थांबविले असता गाडी (क्र. एम.एच- ३९, सी.९२८९) वरील वाहन चालक हा वाहन तेथेच सोडून पळुन गेला.

तसेच वाहन (क्र.एम.एच-४८ Aए.वाय-६३२०) हिच्यावरील वाहन चालकास पोलीसांनी शिताफीने पाठलाग करुन ताब्यात घेतले. छोटू रमेश भिर्ले रा. हेकडवाडी ता.जि.धुळे यास गाडीमधील मालाबाबत विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवु लागला.

त्यामुळे पोलीसांनी वाहनांची तपासणी केली असता त्यात खाकी रंगाचे व पांढर्‍या रंगाचे प्लास्टीकचे पोते दिसले. ती उघडुन पाहिले असता त्यात महाराष्ट्रात बंदी असलेला विमल गुटखा मिळुन आला.

आरोपीतास सदर विमल गुटख्याबाबत विचारपुस केली असता त्यांनी गुजरातमधील निझर येथून धर्मेश घनश्यामदास हासानी रा.नंदुरबार याच्याकडुन विकत घेवून धुळे येथील राहणारे विक्की महादेव परदेशी रा.धुळे, एकनाथ (बाळू) भालचंद्र पाटील रा.धुळे यांनी घेतल्याची माहिती दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे