आपल खान्देश

पाचोरा शहरात सामाजिक ऐक्य व सर्वधर्म समभाव जोपासण्यासाठी स्वाक्षरी मोहीम..

सर्व स्तरातील विविध पंथ, धर्माचे नागरीक एकत्र, गुण्यागोविंदाने नांदत असल्याचे उत्स्फूर्तपणे सह्यांच्या मोहिमेत सामील होवून दाखवून दिले आहे.

झूम मराठी न्यूज नेटवर्क

पाचोरा (प्रतिनिधी) जळगाव पोलीस अधिक्षक प्रवीण मुंढे यांच्या संकल्पनेतून जळगाव जिल्हा पोलीस दल तर्फे सामाजिक ऐक्य व सर्वधर्म समभाव जोपासण्यासाठी जिल्ह्यात स्वाक्षरी मोहीम हा उपक्रम  पाचोरा पोलिस प्रशासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामाजिक ऐक्य जोपासण्यासाठी सह्यांची मोहीम राबविण्यात यशस्वी झाले

पाचोरा उपविभागीय पोलिस अधिकारी भारत काकडे, पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली समाजात एकता व सलोख्याचे वातावरण निर्मिती महिमेचे उद्घाटन आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या मोहीमेस पाचोरा शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून किमान एक हजार सह्यांचे उदिष्ट पुर्ण करण्याचे उद्दिष्ट होते.

यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे, नगरसेवक भुषण वाघ, शिवसेनेचे शहरप्रमुख किशोर बारावकर, माजी नगरसेवक बशीर बागवान, नसीर बागवान, चंदूशेठ केसवानी, प्राचार्य डॉ. वासुदेव वले, प्रा. कमलाकर इंगळे, प्रा. माणिक पाटील, उपप्राचार्य जे. व्ही. पाटील, प्रा. योगेश पूरी, प्रा. सुधाकर कदम, हारुन देशमुख, माजी जि.प. सदस्य राजेंद्र साळुंखे, प्रविण ब्राम्हणे, खंडू सोनवणे, विनोद अहिरे, अमजद खान, एस. के. पाटील, जुल्फिकार बागवान, अॅड. अविनाश सुतार, डॉ. अल्ताफ देशमुख, सुधाकर महाजन, दत्ता बोरसे, संजिता शेख, अशपाक बागवान, पितांबर जाधव आदि पदाधिकारी, महिला, युवक, युवतीसह सर्व स्तरातील विविध पंथ, धर्माचे नागरीक एकत्र, गुण्यागोविंदाने नांदत असल्याचे उत्स्फूर्तपणे सह्यांच्या मोहिमेत सामील होवून दाखवून दिले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे